लहान मुलीच्या हत्येप्रकरणी 7 वर्षांची शिक्षा, जेलबाहेर येताच मोठ्या मुलीवर अत्याचार

| Updated on: Jul 23, 2019 | 4:27 PM

जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना कोंडाळा झामरे येथे घडली. या नराधनम बापाने त्याच्या अल्पवयीन 15  वर्षीय मुलीवर अत्याचार केला.

लहान मुलीच्या हत्येप्रकरणी 7 वर्षांची शिक्षा, जेलबाहेर येताच मोठ्या मुलीवर अत्याचार
Follow us on

वाशिम : जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना कोंडाळा झामरे येथे घडली. या नराधम बापाने त्याच्या अल्पवयीन 15  वर्षीय मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी बापाला अटक करण्यात आली असून पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण शिंदे असं या बापाचं नाव आहे.

हा नराधम बाप लहान मुलीच्या हत्येप्रकरणी सात वर्षांचा कारावास भोगून दोन महिन्यांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर लक्ष्मण शिंदेने स्वत:च्याच 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनेकदा शारिरीक अत्याचार केले. बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने जिल्ह्यात एकचं खळबळ उडाली आहे. या घटनेची तक्रार ग्रामीण पोलिसांत दिल्यानंतर लक्ष्मण शिंदेविरुद्ध 376 कलमासह पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वाशिम तालुक्यातील कोंडाळा झामरे येथे लक्ष्मण शिंदे राहातो. याला काही वर्षांपूर्वी एक बेवारस मुलगी सापडली. या मुलीचा दोन वर्ष त्याने सांभाळही केला. त्यानंतर एक दिवस दारुच्या नशेत त्याने या मुलीची हत्या केली. चिमुकलीच्या हत्येप्रकरणी लक्ष्मणला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. तो दोन महिन्यांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर बाहेर आल्यावर त्याने स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

पिडीत मुलीच्या आईचा ती लहान असतानाच मृत्यू झाला. लहान मुलीच्या हत्येच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना आजोबाने पीडित मुलीचा सांभाळ केला. मात्र, तुरुंगातून बाहेर येताच नराधम बापाने हे घृणास्पद कृत्य केलं. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरुन या बापाला अटक करण्यात आल्याचं ठाणेदार योगिता भारद्वाज यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये दप्तर मागितल्याने बापाने दोन मुलांना विष पाजले

मंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य

भावाची हत्या, कापलेले शीर घेऊन भाऊ पोलीस ठाण्यात

ब्लॅक पँथरचा डीपी, चिठ्ठीत द एण्ड, पुण्यात मोबाईल गेममुळे तरुणाची आत्महत्या