Exclusive: ‘या तुम्हाला स्वातंत्र्य देतो’ म्हणत तरुणाचा जामियातील आंदोलनात गोळीबार

| Updated on: Jan 30, 2020 | 3:39 PM

दिल्लीतील जामिया नगर परिसरात सुरु असलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधातील (CAA) आंदोलनात गोळीबार झाल्याची गंभीर घटना घडली आहे (Firing in Anti CAA Protest).

Exclusive: या तुम्हाला स्वातंत्र्य देतो म्हणत तरुणाचा जामियातील आंदोलनात गोळीबार
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीतील जामिया नगर परिसरात सुरु असलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधातील (CAA) आंदोलनात गोळीबार झाल्याची गंभीर घटना घडली आहे (Firing in Anti CAA Protest). या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाली. यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला तात्काळ ताब्यात घेतलं आहे. आरोपीची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आंदोलनकर्ते दिल्लीतील जामिया नगर येथून राजघाटपर्यंत मोर्चा नेणार होते. दरम्यान एका व्यक्तीने मोर्चात घूसून आंदोलनकर्त्यांवर पिस्तुल रोखत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कुणाला स्वातंत्र्य हवं त्यांनी या मी स्वातंत्र्य देतो असं म्हणत आरोपीने जमावाच्या दिशेने गोळीबारही केला. यात एक व्यक्ती जखमी झाली.

आरोपी तरुणाने गोळीबार करण्याआधी मोठमोठ्याने ओरडून आपली ओळख रामभक्त गोपाळ अशी सांगितली. तो म्हणाला, “मी रामभक्त गोपाळ आहे. या तुम्हाला मी स्वातंत्र्य देतो.” आरोपी तरुणाची ओळख पटवण्याचं आणि त्यांच्या हल्लामागील कारणांचा पोलीस तपास करत आहेत.

पिस्तुल दाखवल्यानंतर मोर्चातील एका व्यक्तीने आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी तरुणाने गोळी झाडली. त्यात संबंधित आंदोलकर्ता जखमी झाला. त्याच्या हातात गोळी लागली. जखमी तरुणाचं नाव शादाब आलम असून तो जामिया विद्यापीठातील विद्यार्थी आहे. शादाबला होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

गोळी झाडली तेव्हा टीव्ही9 चं पथक घटनास्थळावर होतं. ही संपूर्ण घटना टीवी9 च्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी गोळी झाडणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तसेच सीएए विरोधातील मोर्चा जामिया नगरमध्येच थांबवण्यात आला. मोर्चात सहभागी लोकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. संबंधित आरोपी युवक बाहेरुन येऊन मोर्चात घुसला आणि गोळीबार केला मात्र, पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

 व्हिडीओ: