जयपूरमध्ये पावसाचा हाहा:कार, तीन तासांच्या पावसाने गुलाबी शहराच्या गल्ल्या सुन्न

| Updated on: Aug 14, 2020 | 11:56 PM

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात पावसाने धुमाकूळ घातला (Flood in Jaipur due to heavy rain).

जयपूरमध्ये पावसाचा हाहा:कार, तीन तासांच्या पावसाने गुलाबी शहराच्या गल्ल्या सुन्न
Follow us on

जयपूर : राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात शुक्रवारी (14 ऑगस्ट) पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. मुसळधार पावसामुळे जयपूरमधील रस्ते, घरं पाण्याखाली गेले. रस्त्यावरील अनेक गाड्या, माणसं महापुरात वाहून गेले. अनेकांचा संसार कचऱ्यासारखा वाहून गेला (Flood in Jaipur due to heavy rain).

जयपूरच्या अनेक गल्ल्यांमधील पहिले मजले पाण्यात गेले आहेत. बाथरुमचे पाईप, स्लॅपमध्ये काढलेल्या सळईनं लोकांनी आधार शोधला. महापूर जयपूरमधील अरुंद गल्ल्यांमुळे आला, असं तेथील स्थानिक सांगत आहेत. मात्र, याच अरुंद गल्ल्यांमुळे अनेकांचा जीव वाचल्याची माहितीदेखील समोर येत आहे (Flood in Jaipur due to heavy rain).

हेही वाचा : मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस, पुणे, नाशिक, जळगाव आणि साताऱ्यातील धरणांमधून पाणी विसर्ग

महापुरानं फक्त अरुंद गल्ल्यांमध्येच तांडव केला नाही. तर अनेक ऐतिहासिक वाडे आणि अलिशान भागांमध्ये गाड्या अक्षरक्षः तरंगत होत्या. शहरातील छोट्यापासून ते मोठ्या दुकानांमध्ये पाणी शिरलंय. लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. याशिवाय काही लोकांचा यात मृत्यूदेखील झाल्याची माहिती समोर आली आहे.

जयपूरमध्ये फक्त तीन तास पाऊस झाला. मात्र या तीनच तासात शहरात पाणीच पाणी झालं. आजूबाजूच्या उंच भागातून पाणी थेट शहरात शिरलं. त्यानंतर जयपूरमध्ये हाहा:कार झाला. संपूर्ण शहरात पाणी साचलं असताना तिथे अजूनही पाऊस सुरुच आहे.

जयपूरच्या पुराचा एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियात फिरतोय. मात्र, तो काल आलेल्या पुराचा आहे की नाही, याची अजून पुष्टी झालेली नाही. गुलाबी शहराच्या गल्ल्या फक्त तीन तासांच्या पाण्यात काळ्या कचऱ्यानं काळवंडल्या आहेत. भारताची पिंक सिटी फक्त तीनच तासात सुन्न झाली.

जयपूरमधील महापुराचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ