भीमा-कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीची मागणी

| Updated on: Jan 28, 2020 | 3:08 PM

देवेंद्र फडणवीस यांची भीमा-कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगासमोर उलट तपासणी करा, अशी मागणी कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय लाखे पाटील यांनी केली (devendra fadnavis may inquire Koregaon Bhima) आहे.

भीमा-कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीची मागणी
Follow us on

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भीमा-कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगासमोर उलट तपासणी करा, अशी मागणी कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय लाखे पाटील यांनी केली (devendra fadnavis may inquire Koregaon Bhima) आहे. आपल्या विशेषाधिकाराचा वापर करुन देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे.

गेल्यावर्षी विधानसभेतील निवेदनात फडणवीसांनी भीमा कोरेगाव या ठिकाणच्या हिंसाचाराला शिवप्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि त्यांचे समर्थक जबाबदार असल्याचं मान्य केलं होतं. त्यांनी डाव्या विचारसरणीचे नेते किंवा शहरी नक्षलवादाचा यात कुठेही उल्लेख केला नव्हता. तत्कालीन भाजप सरकारने तपास करताना विचारवंत, प्राध्यापक, वकिलांना, ‘शहरी नक्षलवाद’ अशी लेबल लावताना खऱ्या गुन्हेगारांच्या भूमिकेकडे मात्र दुर्लक्ष केलं आहे, असे या याचिकेत म्हटलं (devendra fadnavis may inquire Koregaon Bhima) आहे.

भीमा कोरेगाव, वडू आणि सणसवाडी या ठिकाणचे फोन, मोबाईल रेकॉर्ड, पोलीस कंट्रोल रुमचे रेकॉडर्स, वायरलेस रेकॉर्ड तपासण्याची मागणी संजय लाखे यांनी केली आहे. दगडफेक आणि जाळपोळीमध्ये सहभागी असणाऱ्यांना स्थानिक पोलिसांनी सरंक्षण दिल्याचा आरोपही संजय पाटील यांनी केला आहे.

माजी मुख्यमंत्र्यांचं निवदेन म्हणजे हिंदुत्त्ववादी नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे. हिंसाचारात भगवे झेंडे फडकावणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांचं स्थानिक पोलिसांनी सरंक्षण केलं. यावरही त्यांनी भाषण केलं नाही. फडणवीस यांचं निवदेन आणि पोलिसांच्या तपासात विसंगती असल्याने त्यांना चौकशीसाठी बोलवणं गरजेचं आहे, असेही डॉ. संजय लाखे यांनी याचिकेत (devendra fadnavis may inquire Koregaon Bhima) म्हटलं आहे.

डॉ. संजय लाखे पाटील यांनी याबाबत अनेक याचिका दाखल केल्या आहेत. त्यातील एका याचिकेत देवेंद्र फडणवीस यांची साक्षीदार म्हणून उलट तपासणी करावी अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विधानसभेत मांडलेली भूमिका आणि पुणे पोलिसांचा तपासातील मुद्दे यात विसंगती असल्याचे यात म्हटलं आहे. डॉ. संजय लाखे पाटील यांनी दाखल केलेल्या अर्जावर बुधवारी निर्णय घेतला जाणार आहे.

कोरेगाव भीमा दंगल हे फडणवीस सरकारचं षडयंत्र, पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान “कोरेगाव भीमा हिंसाचारामागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे,” असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. पवारांच्या या गंभीर आरोपामुळे सर्वत्र एकच खळबळ उडालेली होती.

“भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज आहे. कारण देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेचा चुकीचा वापर केला. फडणवीस सरकारने माध्यमांनाही चुकीची माहिती दिली. तसेच पोलिसांच्या मदतीने हे घडविलेले षडयंत्र होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा डाव होता, असा आरोप पवारांनी केला (devendra fadnavis may inquire Koregaon Bhima) आहे.