भारतीय वंशाचे डॉ.गौरव शर्मा न्यूझीलंडच्या संसद सदस्यपदी, शपथविधीसाठी संस्कृत भाषेची निवड

| Updated on: Nov 25, 2020 | 7:58 PM

गौरव शर्मा न्यूझीलंडचे सर्वात तरुण खासदार म्हणून निवडून आले आहेत. (Gaurav Sharma is one of the youngest MP of New Zealand)

भारतीय वंशाचे डॉ.गौरव शर्मा न्यूझीलंडच्या संसद सदस्यपदी, शपथविधीसाठी संस्कृत भाषेची निवड
Follow us on

वेलिंग्टन : भारतीय वंशाचे डॉ.गौरव शर्मा यांनी न्यूझीलंडमध्ये संसद सदस्य म्हणून शपथ घेत इतिहास रचला आहे. डॉ. शर्मा यांनी न्यूझीलंडच्या संसदेत संस्कृत भाषेत शपथ घेतली. गौरव शर्मा मुळचे हिमाचल प्रदेश राज्यातील हमीरपूर जिल्ह्यातील आहेत. हेमिल्टन वेस्टमधून लेबर पार्टीकडून गौरव शर्मांनी निवडणूक लढवली होती. (Gaurav Sharma is one of the youngest MP of New Zealand)

न्यूझीलंडमधील उच्चायुक्त मुक्तेश परदेशी गौरव शर्मा यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. गौरव शर्मा न्यूझीलंडच्या संसदेचे सर्वात तरुण संसद सदस्य आहेत. शपथविधी दरम्यान गौरव शर्मांनी प्रथम माओरी भाषेत शपथ घेतली त्यानंतर त्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली. गौरव शर्मांनी माओरी आणि संस्कृत भाषेत शपथ घेऊन दोन्ही देशांच्या संस्कृतींचा सन्मान केला आहे.


गौरव शर्मांनी हिंदी ऐवजी संस्कृतमध्ये शपथ घेण्याचे कारण सांगितले. ” पहिल्यांदा पहाडी किंवा पंजाबी भाषेत शपथ घेण्याचा विचार होता, त्यामुळे सर्वांचे समाधान करण्यासाठी संस्कृत भाषेत शपथ घेतली, असं शर्मा म्हणाले. (Gaurav Sharma is one of the youngest MP of New Zealand)

लेबर पार्टीकडून विजयी

डॉ. गौरव शर्मांनी हेमिल्टनमधून लेबर पार्टीकडून विजय मिळवला आहे. गौरव शर्मांच्या विरोधात नॅशनल पार्टीचे मॅकिन्डो निवडणूक लढवत होते. गौरव शर्मांनी मॅकिन्डो यांचा 4386 मतांनी पराभव केला.

गौरव शर्मा 1996 मध्ये न्यूझीलंडला गेले होते. शर्मांनी त्यांच्या आणि कुटुंबाबद्दल माहिती दिली. त्यांच्या वडिलांना पहिल्यांदा सहा वर्ष नोकरी मिळाली नाही. कुटुंबानं खूप कठिण प्रसंगांचा सामना केला. आता समाजसेवा करण्यासाठी राजकारणात आल्याचे शर्मांनी सांगितले. न्यूझीलंडनं आम्हाला सामाजिक सुरक्षा दिली, असंही शर्मा म्हणाले. (Gaurav Sharma is one of the youngest MP of New Zealand)

संबंधित बातम्या:

जगातील सर्वात वेगळ्या मंत्रिमंडळाची निवड, न्यूझीलंडच्या जेसिंडा मंत्रिमंडळातील थक्क करणाऱ्या 9 गोष्टी

New Zealand Corona | कोरोनाचा परिणाम, न्यूझीलंडच्या निवडणुका महिनाभरासाठी लांबणीवर

(Gaurav Sharma is one of the youngest MP of New Zealand)