Mridula Sinha | भाजपच्या दिग्गज नेत्या मृदुला सिन्हा यांचे निधन

| Updated on: Nov 18, 2020 | 5:08 PM

ऑगस्ट 2014 ते ऑक्टोबर 2019 या काळात भाजप नेत्या मृदुला सिन्हा यांनी गोव्याचे राज्यपालपद भूषवले.

Mridula Sinha | भाजपच्या दिग्गज नेत्या मृदुला सिन्हा यांचे निधन
Follow us on

पणजी : गोव्याच्या माजी राज्यपाल आणि भाजपच्या दिग्गज नेत्या मृदुला सिन्हा (Mridula Sinha) यांचे निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुशाग्र राजकारणी आणि हरहुन्नरी साहित्यिक अशी त्यांची ख्याती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी सिन्हांना आदरांजली वाहिली आहे. (Goa’s Former Governor and BJP Leader Mridula Sinha passed away)

मृदुला सिन्हा सुरुवातीपासूनच जनसंघाशी जोडलेल्या होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना होत असे. मृदुला सिन्हा यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केल्या जात आहेत.

मृदुला सिन्हा यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1942 रोजी बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये झाला. मृदुला सिन्हा यांचे पती राम कृपाल सिन्हा हे बिहार सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. ऑगस्ट 2014 पर्यंत त्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य होत्या.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या प्रचारादरम्यान सिन्हा भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी होत्या. 25 ऑगस्ट 2014 रोजी गोव्याच्या राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 23 ऑक्टोबर 2019 पर्यंत मृदुला सिन्हांनी राज्यपालपद भूषवले.

मृदुला सिन्हा यांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीव्यतिरिक्त लोक परंपरेविषयी त्यांचे लेखनही प्रसिद्ध आहे. छठ महापर्वावरील त्यांच्या लेखनातून जणू गावाच्या मातीचा सुगंध दरवळत असल्याचं वर्णन केलं जातं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून श्रद्धांजली :

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विट :

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदरांजली :

(Goa’s Former Governor and BJP Leader Mridula Sinha passed away)