‘हेल्मेटमुक्ती’साठी पुणेकरांकडून 81 कोटी दंडाचा विक्रम

| Updated on: Dec 24, 2019 | 8:34 PM

पुणे पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांना 81 कोटींचा दंड ठोठावला आहे. यात 16 लाख दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली असून 21 कोटींचा दंड वसूल करण्यात (pune helmet compulsory) आला आहे.

हेल्मेटमुक्तीसाठी पुणेकरांकडून 81 कोटी दंडाचा विक्रम
Follow us on

पुणे : गेल्या 1 जानेवारी 2019 पासून पुणे पोलिसांनी शहरात दुचाकी चालवणाऱ्यांना हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली (pune helmet compulsory) होती. या हेल्मेट सक्तीला येत्या 1 जानेवारीला वर्षपूर्ती होणार आहे. ही वर्षपूर्ती होण्यापूर्वी पुणे पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांना 81 कोटींचा दंड ठोठावला आहे. यात 16 लाख दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली असून 21 कोटींचा दंड वसूल करण्यात (pune helmet compulsory) आला आहे.

पुण्यात 1 जानेवारी 2019 पासून पुणे पोलिसांनी हेल्मेटसक्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते. यानंतर एका वर्षात पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात पुणे पोलिसांनी शहरातील 16 लाख दुचाकी स्वारांवर कारवाई केली असून 84 कोटींचा दंड ठोठावला आहे. वाहतूक पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेरे तसेच प्रत्यक्ष चौकात थांबून ही कारवाई केली आहे.

आतापर्यंत यातील 21 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर दुचाकी स्वारांना हेल्मेट बंधनकारक केले. त्यानंतर पुण्यात ही कारवाई तीव्र करण्यात (pune helmet compulsory) आली.

या हेल्मेट सक्तीला हेल्मेट विरोधी कृती समितीने शहरात हेल्मेटला विरोध केला. आंदोलन मोर्चे काढले. तरीही पुणे पोलिस हेल्मेट कारवाईवर ठाम राहिले. मात्र याचा फटका सामान्य पुणेकरांना बसला आहे. सामान्य पुणेकरांकडून वाहतूक पोलिसांनी थोडा थोडका नाही तर तब्बल 81 कोटी दंड वसूल केला आहे.

यावर हेल्मेट विरोधी कृती समितीने पोलिस 100 कोटी रुपयांचे लक्ष्य का पूर्ण करत आहेत असा आरोप केला आहे. पोलिसांनी आता गुजरात सरकारसारखे ऐच्छिक हेल्मेट सक्ती करावी. याबाबत जुन्या सरकारने घेतलेले निर्णय नवीन सरकारने रद्द करावे यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी वसूल केलेल्या दंडावर टीका केली जात आहे. मात्र यावर पोलिसांनी काहीही प्रतिक्रिया (pune helmet compulsory) दिलेली नाही.