Golden Globe Awards 2020 : रेड कार्पेटवर प्रियांका-निकचा जलवा, ‘हे’ ठरले सर्वोकृष्ट अभिनेता, अभिनेत्री

| Updated on: Jan 06, 2020 | 3:11 PM

या दिमाखदार सोहळ्याला हॉलिवूडच्या मोठ-मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. या अवॉर्ड कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही पती निक जोनससोबत हजेरी लावली.

Golden Globe Awards 2020 : रेड कार्पेटवर प्रियांका-निकचा जलवा, हे ठरले सर्वोकृष्ट अभिनेता, अभिनेत्री
Follow us on

Golden Globe Awards 2020 : हॉलिवूडचा प्रसिद्ध गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2020 कार्यक्रम कॅलिफोर्नियात पार पडला. या दिमाखदार सोहळ्याला हॉलिवूडच्या मोठ-मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. या अवॉर्ड कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही पती निक जोनससोबत हजेरी लावली. यावेळी प्रियांकाने सुंदर गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. या अवॉर्ड कार्यक्रमात कुणाला कुठला अवॉर्ड मिळाला, याची यादी आता समोर आली आहे.

Cecil B DeMille Award : अभिनेता टॉम हॅक्सला Cecil B DeMille Award ने पुरस्कृत करण्यात आलं. त्याला हा पुरस्कार मनोरंजन श्रेत्रात त्यांच्या उल्लेखनिय योगदानासाठी देण्यात आला.

बेस्ट परफॉर्मन्स सपोर्टिंग अॅक्टर  : ‘अवॉर्ड वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड’ या सिनेमासाठी अभिनेता ब्रॅड पीटला बेस्ट परफॉर्मन्स सपोर्टिंग अॅक्टर हा अवॉर्ड मिळाला.

सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : दक्षिण कोरिआच्या ‘पॅरासाइट’ला विदेशी भाषेत सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट मोशन चित्रपट : चित्रपट ‘1917’

मोशन चित्रपट – सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स (फीमेल) : रेनी जेल्वेगर

मोशन चित्रपट – सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स (मेल) : जॉकिन फोनिक्स

सर्वोत्कृष्ट मोशन परफॉर्मन्स : वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड

टीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : ओलिविया कोलमॅन


सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स (अभिनेत्री) – संगीत आणि विनोद : ऑक्वाफिना

सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स (अभिनेता) – संगीत आणि विनोद : टेरोन एगर्टन

सर्वोत्कृष्ट ऑरिजिनल स्कोर – मोशन चित्रपट : हिल्डुर गुअनादोतिर

सर्वोत्कृष्ट टेलीव्हिजन लिमिटेड सीरिज आणि मोशन चित्रपट (टीव्ही) : चेर्नोबिल

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री इन लिमिटेड सीरिज : मिशेल विलियम्स


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (टीव्ही ड्रामा) : ब्रायन कॉक्स


सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : ‘1917’ साठी सॅम मेंडेस यांना सर्वोकृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कृत करण्यात आलं

सर्वोत्कृष्ट अभिनेता मोशन चित्रपट ड्रामा : जोआक्विन फिनिक्स (जोकर)

सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर एनिमेटेड : मीसिंग लिंक

सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले मोशन पिक्चर : क्वेंटिन टारनटिनो (वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड)

सर्वोत्कृष्ट ऑरिजिनल सॉन्ग मोशन पिक्चर : आई एम गोना लव मी अगेन, (रॉकेटमैन)

कॅरल बर्नेट अवार्ड : एलेन डिजेनरेस

टेलीव्हीजन मोशन पिक्चर आणि लिमिटेड सीरिजमध्ये सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स (अभिनेत्री) : मिशेल विलियम्स (फोससे/वेर्डों)

टेलीव्हीजन मोशन पिक्चर आणि लिमिटेड सीरिजमध्ये सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स (अभिनेता) : रसेल क्रो, (द लाऊडेस्ट वायस)

टेलीव्हीजन मोशन पिक्चर आणि लिमिटेड सीरिजमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सपोर्टिंग रोल : पेट्रीसिया आर्केट (द एक्ट)

टेलीव्हीजन मोशन पिक्चर आणि लिमिटेड सीरिजमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता सपोर्टिंग रोल : स्टेलन स्कार्सगार्ड, (चेर्नोबिल)

Golden Globe Award 2020 Winners List