सावर्ड्यातील ‘होल्टे होम’ होळी!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

रत्नागिरी : देशभरात होळी हा सण वेगवेगळ्यापद्धतीने साजारा केला जातो. कोकाणातल्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे या ठिकाणीही एक आगळीवेगळी होळी पाहायला मिळते. चिपळूणमध्ये होळीपूर्वी नऊ दिवस होळी पेटवली जाते. त्यानंतर दहाव्या दिवशी सकाळी होम करण्याची प्रथा आहे. मात्र, सावर्ड्यात होमआधी होळीच्या आदल्यारात्री होळी खेळण्याची परंपरा आहे. ही परंपरा ‘होल्टे होम’ नावाने प्रसिद्ध आहे. यामध्ये लाकडं जाळली […]

सावर्ड्यातील ‘होल्टे होम’ होळी!
Follow us on

रत्नागिरी : देशभरात होळी हा सण वेगवेगळ्यापद्धतीने साजारा केला जातो. कोकाणातल्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे या ठिकाणीही एक आगळीवेगळी होळी पाहायला मिळते. चिपळूणमध्ये होळीपूर्वी नऊ दिवस होळी पेटवली जाते. त्यानंतर दहाव्या दिवशी सकाळी होम करण्याची प्रथा आहे. मात्र, सावर्ड्यात होमआधी होळीच्या आदल्यारात्री होळी खेळण्याची परंपरा आहे.

ही परंपरा ‘होल्टे होम’ नावाने प्रसिद्ध आहे. यामध्ये लाकडं जाळली जातात. ही लाकडं म्हणजे लाकडाचे छोटे दोन ते तीन फुटाचे होल्टे असतात. ही जळलेली लाकडं म्हणजेच होल्टे हे अर्धवट जळलेले असताना ते हातात घेऊन समोर उभ्या असलेल्या मानकऱ्यांच्या अंगावर भिरकावण्याची ही अनोखी प्रथा आहे. यामध्ये दोन गटएकमेकांच्या अंगावर ही जळती लाकडं फेकतात. संपूर्ण काळोखात हा खेळ सुरु असतो. हे दृष्य पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असते. अश्या अनोख्या पद्धतीने हा ‘होल्टे होम’ साजरा केला जातो.

होळीच्या आदल्या रात्री देवाच्या फडात म्हणजेच मैदानात गावकरी एकत्र येतात. होळीपूर्वी नऊ दिवस गावात प्रत्येक वाडीत होळी पेटवली जाते. या होळीतील लाकडं म्हणजेच होल्टे घेऊन ढोल-ताशांच्या गजरात मैदानापर्यंत मिरवणूक काढली जाते.

मोठ्या मैदानात एका बाजूला गावातील मानकरी खोत, तर दुसऱ्या बाजूला गुरव आणि गावकरी असतात. दोन्ही गटातील ही मंडळी हातातील होल्टे एकत्र करुन ते पेटवतात आणि पुन्हा पेटलेले होल्टे उचलून मैदानात एकमेकांच्या समोर उभे राहतात. त्यानंतर तीन ‘फाका’ मारुन आळीपाळीने हे दोन्ही गट हातामधील पेटते होल्टे एकमेकांवर फेकतात. तीनवेळा होल्टे फेकल्यानंतर सर्व जण एकत्र येऊन होल्टे जमा करतात आणि त्याच फडात त्याचा होम पेटवून ग्रामदेवतेच्या नावाने फाका मारतात.

पूर्वापारपासून चालत आलेल्या या प्रथेत कुणालाही इजा होत नसल्याचं ग्रामस्थ सांगतात. गावातील सर्व  समाज एकत्र येऊन ढोल-ताशे, सनईच्या तालावर हा आगळावेगळा ‘होल्टे होम’ साजरा करतात. अशा प्रकारे साजरी होणारी ही महाराष्ट्रातील एकमेव होळी आहे.