मराठी किती राज्यांतील शाळांमध्ये प्रथम भाषा, कोणत्या राज्यांत द्वितीय भाषा?

| Updated on: Sep 24, 2019 | 11:34 AM

2011 मधील भाषिक आकडेवारीनुसार मराठी ही फक्त महाराष्ट्रातच (Marathi as First Language) सरकारी शाळांमध्ये प्रथम भाषा म्हणून शिकवली जाते.

मराठी किती राज्यांतील शाळांमध्ये प्रथम भाषा, कोणत्या राज्यांत द्वितीय भाषा?
Follow us on

मुंबई : विविधतेतील एकता हे भारताचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. भाषिक विविधता ही आपल्या उदारमतवादी आणि लोकशाही समाजाची महत्त्वाची ओळख मानली जाते. मराठी भाषा ही किती राज्यांमधील शैक्षणिक अभ्यासक्रमात (Marathi as First Language) प्रथम, द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून शिकवली जाते, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे.

हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे की नाही, यावरील वाद जुना आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी मांडलेली ‘एक देश एक भाषा’ आणि ‘त्रिभाषिक सूत्र’ राष्ट्रीय शिक्षण धोरणातील नवा चर्चेचा मुद्दा आहे. राज्यभरात बोलल्या जाणाऱ्या प्राथमिक भाषांविषयी आपल्याला माहिती आहेच. मात्र त्या राज्यांतील शालेय अभ्यासक्रमात द्वितीय आणि तृतीय भाषा कोणत्या शिकवल्या जातात, मराठी भाषा कोणत्या राज्यांमध्ये शाळेत शिकवली जाते, यासारखी माहिती वाचणं उत्सुकतेचं आहे.

2011 मधील भाषिक आकडेवारीनुसार मराठी ही फक्त महाराष्ट्रातच (Marathi as First Language) सरकारी शाळांमध्ये प्रथम भाषा म्हणून शिकवली जाते. तर गोवा आणि मध्य प्रदेशात ती द्वितीय भाषा म्हणून शिकवली जाते. दमण, दीव आणि दादरा नगर हवेलीमध्ये मराठी तृतीय भाषा म्हणून शिकवली जाते.

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो

हिंदी भाषा 12 राज्यांमध्ये प्रथम भाषा म्हणून शिकवली जाते. यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड यासारख्या राज्यांचा समावेश आहे. तर 14 राज्यांमध्ये हिंदी द्वितीय भाषा म्हणून शिकवली जाते.

सर्वाधिक राज्यांमध्ये प्रथम भाषा म्हणून शिकवल्या जाणाऱ्या भाषेत बंगालीचा दुसरा क्रमांक लागतो. पश्चिम बंगाल, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम, अंदमान निकोबार या राज्यांमध्ये ती द्वितीय भाषा म्हणून शिकवली जाते.

पंजाबी ही पाच राज्यं किंवा केंद्रशासित प्रदेशांची द्वितीय भाषा आहे. द्वितीय भाषांमध्ये पंजाबीनंतर उर्दू (चार राज्यं), बंगाली (तीन राज्यं) यांचा क्रमांक लागतो.

तृतीय भाषा म्हणून उर्दू सर्वात लोकप्रिय असल्याचं दिसून आलं आहे. तब्बल आठ राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये उर्दू तृतीय भाषा म्हणून शिकवली जाते.

नेपाळी भाषा ही एकाच (मणिपूर) राज्यात द्वितीय भाषा आहे, तर तब्बल पाच राज्यांची (हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मेघालय) तृतीय भाषा आहे.