जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट, युद्ध झालंच तर ‘हे’ देश येणार समोरासमोर

| Updated on: Jan 05, 2020 | 9:51 PM

वॉशिंग्टन : जगभरात आज तिसऱ्या महायुद्धाची चर्चा सुरु आहे. सुरुवातीला अमेरिकेने बगदादमध्ये ड्रोन हल्ला केला (crises between US and Iran). या ड्रोन हल्ल्यात इराणचे जनरल कासीम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणने शनिवारी मध्यरात्री अमेरिकेच्या दूतावासावर क्षेपणास्त्र हल्ला केला. याशिवाय अमेरिकेच्या लष्करी तळावरही इराणने हल्ला केला. त्यामुळे अमेरिकेने पुन्हा एकदा इराणला इशारा दिला. दोन्ही देशांमध्ये […]

जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट, युद्ध झालंच तर हे देश येणार समोरासमोर
Follow us on

वॉशिंग्टन : जगभरात आज तिसऱ्या महायुद्धाची चर्चा सुरु आहे. सुरुवातीला अमेरिकेने बगदादमध्ये ड्रोन हल्ला केला (crises between US and Iran). या ड्रोन हल्ल्यात इराणचे जनरल कासीम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणने शनिवारी मध्यरात्री अमेरिकेच्या दूतावासावर क्षेपणास्त्र हल्ला केला. याशिवाय अमेरिकेच्या लष्करी तळावरही इराणने हल्ला केला. त्यामुळे अमेरिकेने पुन्हा एकदा इराणला इशारा दिला. दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे (crises between US and Iran).

अमेरिकेचे लष्कर युद्धासाठी सज्ज असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे इराण देखील युद्धाच्या तयारीत आहे. इराणने कोममधील जमकरान मशिदीवर लाल झेंडा फडकावला आहे. मशिदीवर लाल झेंडा फडकवणे म्हणजे युद्धाची घोषणा होणे किंवा बलिदानाची तयारी असणे. त्यामुळे आता जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग दाटून आले आहेत.

अमेरिकेच्या बाजूला ‘हे’ देश

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव हा जगभरातील देशांची डोकेदुखी बनला आहे. युरोपीय संघाने दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. मात्र, तरीही युद्ध झाले तर अमेरिकेला सर्वात अगोदर इस्त्रायल देशाचा पाठिंबा मिळेल. इस्त्रायल देशाने इराणचे जनरल कासीम सुलेमानी यांना नेहमीच शत्रू मानले आहे. “अमेरिकेला स्वरक्षणाचा अधिकार आहे”, असे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू म्हणाले.

“अमेरिकेतील कित्येक निर्दोष नागरिकांच्या मृत्यूला कासीम सुलेमानी जबाबदार आहे. तो अनेक प्राणघातकी हल्ल्यांची तयारी करत होता”, असे देखील नेत्यान्याहू म्हणाले. इस्त्रायल वगळता इंग्लंड, फ्रान्स, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि युएई हे देश देखील अमेरिकेसोबत असण्याची दाट शक्यता आहे. या देशांनी अजून तरी खुलेपणाने अमेरिकेचे समर्थन केलेले नाही. दरम्यान, सौदी अरेबियाचे किंग सलमान यांनी इराकचे राष्ट्रपती बेहरम सालेह यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. इराकच्या संरक्षणासाठी सौदी अरेबिया इराकच्याच बाजूने असेल, असे किंग सलमान म्हणाले आहेत.

कासीम सुलेमान यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी रविवारी इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. इराणकडून संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तय्यप यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. ब्रिटनने देखील या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत शांत राहण्याचे आवाहन दोन्ही देशांना केले आहे.

इराणच्या बाजूला ‘हे’ देश

“अमेरिका आपल्या सैन्याचा उपयोग चुकीच्या मार्गाने करत आहे”, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले आहेत. यासंदर्भात वांग यी यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. याशिवाय रशियाने देखील अमेरिकेच्या कारवाईला ‘अनैतिक’ म्हटले आहे.

दरम्यान, चीनने इराणच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. “अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नियम तोडले आहेत. या विषयावर चर्चा करुन प्रश्न सुटले पाहिजेत”, असे चीनने म्हटले आहे. चीनसोबतच यमन, लेबनन, सीरिया आणि फिलिस्तीन देश इराणला साथ देण्याची शक्यता आहे. याशिवाय सीरिया देखील इराणच्या बाजूला आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यावर सीरियाने शोक व्यक्त केला होता. तर अमेरिकेवर टीका केली होती.