सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने दंड, देशात पहिली कारवाई

| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

अहमदाबाद (गुजरात) : सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकल्याप्रकरणी अहमदाबाद महापालिकेने एका व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली आहे. पान खाऊन थुंकल्याप्रकरणी देशात पहिल्यांदाच कारवाई करण्यात आल्याचा दावा अदमदाबाद पालिकेने केला आहे. अहमदाबाद पालिकेच्या पूर्व उपनगर भागात राहणाऱ्या महेश कुमार या व्यक्तीवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी महेश कुमार हे सरदार पटेल मूर्ती रोडजवळ फिरत असताना त्यांनी गुटखा खाल्ला […]

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने दंड, देशात पहिली कारवाई
Follow us on

अहमदाबाद (गुजरात) : सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकल्याप्रकरणी अहमदाबाद महापालिकेने एका व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली आहे. पान खाऊन थुंकल्याप्रकरणी देशात पहिल्यांदाच कारवाई करण्यात आल्याचा दावा अदमदाबाद पालिकेने केला आहे. अहमदाबाद पालिकेच्या पूर्व उपनगर भागात राहणाऱ्या महेश कुमार या व्यक्तीवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी महेश कुमार हे सरदार पटेल मूर्ती रोडजवळ फिरत असताना त्यांनी गुटखा खाल्ला आणि जवळच थुंकले.  हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर अहमदाबाद पालिकेने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवल्या कारणामुळे महेश यांना 100 रुपयांचा दंड आकारला आहे.

स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार जाहीर

भारत सरकारद्वारे देण्यात येणारा स्वच्छता सर्वेक्षण 2019 हा पुरस्कार पुन्हा एकदा इंदूर शहराने पटकावला आहे. तर सर्वात स्वच्छ राजधानी या पुरस्कारातील पहिला क्रमांक भोपाळला मिळाला आहे. त्याशिवाय छत्तीसगढ राज्याला सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून गौरवण्यात आलं आहे.

तर 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येचे स्वच्छ शहर म्हणून अहमदाबादला पुरस्कार मिळाला आहेत. तसेच पाच लाखांपेक्षा कमी लोकसंख्येचे स्वच्छ शहर म्हणून उज्जैनला गौरवण्यात आले आहे.

भारत सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण या पुरस्कारासाठी शहरी विकास मंत्रालयाने देशातील विविध राज्यातील 4 हजार 237 शहरात सर्वेक्षण केले होते. त्यानंतर वेगवेगळ्या श्रेणीद्वारे आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.