जागतिक राजकारणात डंका, भारतीय वंशांच्या 7 शक्तिशाली महिला

| Updated on: Nov 03, 2020 | 7:50 PM

भारतीय वंशाच्या महिलांनी जागतिक राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या महिलांनी त्या देशातील प्रशासनात वरिष्ठ पदावर अधिकारी होण्यापासून तर अगदी एखाद्या देशाचं पंतप्रधान होण्यापर्यंत आपलं कर्तुत्व दाखवलं आहे.

जागतिक राजकारणात डंका, भारतीय वंशांच्या 7 शक्तिशाली महिला
Follow us on

वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे लोक जगभरात अनेक देशांमध्ये राहतात. ते केवळ त्या त्या देशातील सामान्य नागरिक आहेत असं नाही, तर त्यांनी त्या देशांमध्ये मोठमोठ्या पदांपर्यंत झेप घेतली आहे. यात भारतीय वंशाच्या महिलांनी जागतिक राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या महिलांनी त्या देशातील प्रशासनात वरिष्ठ पदावर अधिकारी होण्यापासून तर अगदी एखाद्या देशाचं पंतप्रधान होण्यापर्यंत आपलं कर्तुत्व दाखवलं आहे. यात अमेरिका, कॅनडा, नॉर्वे, डेन्मार्क, न्‍युझीलंडसारख्या देशांचा समावेश आहे. आपण अशाच 7 महिला नेत्यांविषयी माहिती घेणार आहोत (Indian origin women leaders NRI in world politics).

1. प्रियंका राधाकृष्‍णन

न्युझीलंडमध्ये स्पष्ट बहुमतासह सत्तेत आलेल्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न यांच्या या नव्या मंत्रिमंडळात एका भारतीय वंशाच्या महिला नेत्याचा समावेश झालाय. प्रियंका राधाकृष्णन असं या महिला मंत्र्याचं नाव आहे. न्युझीलंडच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या महिलेचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. अर्डर्न यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळात 5 नव्या मंत्र्यांचा समावेश केला आहे.

प्रियंका यांनी कौटुंबिक हिंसाचाराचा बळी ठरलेल्या महिलांसाठी मोठं काम केलं आहे. त्या मुळच्या केरळमधील परावूर येथील आहेत. मात्र, त्यांचा जन्‍म चेन्‍नईमध्ये झाला होता. त्यांचे आजोबा देखील भारतातील डाव्या पक्षांच्या राजकारणात सक्रीय होते.

2. कमला हॅरिस

ऑक्‍टोबर 1964 ला जन्‍म झालेल्या कमला हॅरिस अमेरिकेच्या सिनेटमध्ये निवडून जाणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत. सध्या त्या सिनेटच्या सदस्य तर आहेच, सोबत डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार देखील आहेत. त्या 2016 मध्ये पहिल्यांदा डेमॉक्रेटिक पक्षाच्या सिनेट सदस्‍य झाल्या. सिनेटमध्ये त्या कॅलिफोर्नियाचं प्रतिनिधित्‍व करतात. याआधी त्या 2011 ते 2017 पर्यंत स्‍टेट अॅटोर्नी जनरल देखील होत्या.

3. कमला प्रसाद बिसेसर

त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर भारतीय वंशाच्या आहेत. त्या केवळ भारतीय वंशाच्या नसून त्रिनिदादच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. त्या 2010 ते 2015 या काळात पंतप्रधान पदावर होत्या.

कमला प्रसाद यांचा जन्म 22 एप्रिल 1952 ला त्रिनिदाद अँड टोबॅगोतील पेनल येथे झाला. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केली. राजकारणात त्या खूप उशिरा आल्या. मात्र, नंतर त्यांनी अनेक विक्रम केले. 2000 मध्ये त्यांचा पक्ष ‘युनायटेड नॅशनल काँग्रेस’ सत्तेत आल्यावर त्या आधी शिक्षणमंत्री झाल्या. यानंतर 2006 मध्ये त्या विरोधी पक्षनेत्या झाल्या. या पदावर असणाऱ्या त्या त्रिनिदादच्या इतिहासातील पहिल्या महिला होत्या.

4. प्रीती पटेल

प्रीती सुशील पटेल ब्रिटिश राजकारणी आणि सध्या ब्रिटनच्या गृह सचिव आहेत. त्या 2010 पासून एसेक्समध्ये विथमच्या खासदार आहेत. पटेल 2016 ते 2017 पर्यंत आंतरराष्ट्रीय विकास सचिवही होत्या. त्या ब्रिटनच्या कंझरवेटिव्ह पक्षाच्या नेत्या आहेत. पटेल भारतीय वंशाच्या असून त्यांचे आई-वडिल गुजरातमधून युगांडाला स्थायिक झाले होते. नंतर ते ब्रिटनला आले. प्रीती पटले यांचा जन्म लंडनमध्ये झाला आहे.

प्रीती पटेल यांच्याकडे 2019 मध्ये ब्रिटेनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्या ब्रेग्जिट समर्थक नेत्यांपैकी प्रमुख चेहरा मानल्या जातात.

5. अनिता आनंद 

भारतीय वंशाच्या अनिता इंदिरा कॅनडाच्या सरकारमध्ये सार्वजनिक सेवा आणि खरेदी मंत्री आहेत. हाऊस ऑफ कॉमन्‍समध्ये त्या ऑकविलेचं प्रतिनिधित्‍व करतात. कॅनडामध्ये फेडरल मिनिस्‍टर पदापर्यंत झेप घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला नेत्या आहेत. त्या लिबरल पक्षाच्या सदस्‍य आहेत.

6. रूबी धल्‍ला आणि नीना ग्रेवाल

रुबी धल्‍ला आणि नीना ग्रेवाल दोघीही कॅनडातील भारतीय वंशाच्या राजकीय नेत्या आहेत. दोघाही कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्‍समध्ये जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या शिख महिला आहेत. रूबी यांनी 2004 ते 2011 पर्यंत हाऊस ऑफ कॉमन्‍समध्ये ब्रॅम्‍पटन-स्प्रिंगडेलचं प्रतिनिधित्‍व केलं. त्या लिबरल पक्षाच्या सदस्‍य आहेत. नीना ग्रेवाल कंजरवेटिव्ह पक्षाच्या नेत्या आहेत.

हेही वाचा :

अमेरिकेत भारतीय वंशाच्या अनिकाचं Covid-19 औषध बनवण्यावर संशोधन, 18 लाख रुपये जिंकले

राखी सावंत चाळिशीत बोहल्यावर, भेटीनंतर 15 दिवसात NRI तरुणाशी लग्न

Indian origin women leaders NRI in world politics