नव्या वर्षात रेल्वेची नवी भेट

| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई : भारतीय रेल्वेतर्फे वृद्ध आणि महिलांना नवीन वर्षात एक विशेष भेट देण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने वृद्ध आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांसाठी अतिरिक्त लोअर बर्थ आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेतर्फे आता प्रत्येक कोचमधील लोअर बर्थचा कोटा वाढवण्यात येणार आहे. गर्भवती महिलांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासंबंधीचं सर्क्यूलर रेल्वे प्रशासनाने […]

नव्या वर्षात रेल्वेची नवी भेट
Follow us on

मुंबई : भारतीय रेल्वेतर्फे वृद्ध आणि महिलांना नवीन वर्षात एक विशेष भेट देण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने वृद्ध आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांसाठी अतिरिक्त लोअर बर्थ आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेतर्फे आता प्रत्येक कोचमधील लोअर बर्थचा कोटा वाढवण्यात येणार आहे. गर्भवती महिलांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासंबंधीचं सर्क्यूलर रेल्वे प्रशासनाने जारी केलं आहे.

आताच्या परिस्थितीत वृद्ध आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांसाठी स्लीपर, AC-3 आणि AC-2 च्या प्रत्येक कोचमध्ये एकूण 12 सीट आरक्षित आहेत. यामध्ये स्लीपर क्लास अंतर्गत 6 बर्थ, AC-3 आणि AC-2 अंतर्गत 3-3 बर्थ आरक्षित आहेत. तर राजधानी, शताब्दी आणि दुरांतो सारख्या एसी प्रिमीअम गाड्यांमध्ये या कोट्यात 7 सीट आरक्षित असतात.

नवीन बदलानंतर वृद्ध आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला या वर्गातील लोकांना मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रत्येक कोचमध्ये 13 लोअर बर्थ आरक्षित असणार आहेत. यामध्ये स्लीपरमध्ये 6, AC-3 मध्ये 4 आणि AC-2 मध्ये 2 लोअर बर्थ आरक्षित असणार आहेत. तर राजधानी, शताब्दी आणि दुरांतो सारख्या एसी प्रिमीअम गाड्यांमध्ये 9 बर्थ आरक्षित असणार आहेत.

वृद्ध आणि गर्भवती महिलांकडून अनेकदा अशा तक्रारी करण्यात आल्या की, त्यांच्या कोट्यातील लोअर बर्थ या जास्तकरुन कमी वयाच्या महिलांना दिल्या जातात. त्यामुळे त्यांना प्रवासादरम्यान समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे रेव्लेने हा निर्णय घेतला आहे.