इराणचं अमेरिकेला प्रत्युत्तर, अमेरिकेच्या इराकमधील दोन सैन्य तळांवर हल्ला

| Updated on: Jan 08, 2020 | 10:51 AM

अमेरिका आणि इराणमधील तणाव प्रचंड वाढला आहे. इराणने बुधवारी (8 जानेवारी) सकाळी अमेरिकन सैन्याच्या बेस कॅम्पवर हल्ला करत प्रत्युत्तर दिलं आहे (Iran attack on American Army base).

इराणचं अमेरिकेला प्रत्युत्तर, अमेरिकेच्या इराकमधील दोन सैन्य तळांवर हल्ला
Follow us on

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील तणाव प्रचंड वाढला आहे. इराणने बुधवारी (8 जानेवारी) सकाळी अमेरिकन सैन्याच्या तळांवर हल्ला करत प्रत्युत्तर दिलं आहे (Iran attack on American Army base). अमेरिकेने या हल्लाला दुजोरा दिला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनुसार इराणने अमेरिकी सैन्य तळावर जवळपास 9 रॉकेटचा मारा केला. अमेरिकेने मात्र 12 रॉकेट हल्ले झाल्याचा दावा केला आहे.

हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक बोलावत पुढील रणनीती निश्चित केल्याचंही सांगितलं जात आहे. इराणने बॅलिस्टिक रॉकेटने हल्ला केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. यानंतर अमेरिका देखील इराणला उत्तर देण्याच्या तयारीत आहे, असं बोललं जात आहे.

 

इराणकडून अमेरिकेच्या सैन्यतळावर झालेल्या हल्ल्यात अमेरिकेच्या काही लढावू विमानांचं नुकसान झालं आहे. या हल्ल्यानंतर कच्चा तेलाच्या किमतीतही 3.5 टक्के वाढ झाली आहे.

अमेरिकेच्या सैन्य तळांना लक्ष्य केल्यानतर इराणने इस्त्राईल आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवरही हल्ला करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेच्या सैन्याने तात्काळ इराक सोडावे, असाही इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे.