दहशतवाद्यांवर आता आकाशातून नजर, इस्त्रोची नवी मोहीम फत्ते

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

श्रीहरीकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्त्रोमार्फत आज सकाळी 9.27 च्या सुमारास 28 नवीन उपग्रह अवकाशात झेपावलं आहे. या उपग्रहात भारताचा एक, अमेरिकेचे 24, लुथानियाचे 2 तर स्पेन आणि स्विजर्झलँडचे प्रत्येकी एक अशा 28 उपग्रहांचा समावेश आहे. या उपग्रहांमार्फत आकाशातून दहशतवाद्यांवर नजर ठेवता येणार आहे. ही अवकाश मोहीम पूर्ण होण्यासाठी 180 मिनिटांचा अवधी लागणार आहे. PSLV-C-45 […]

दहशतवाद्यांवर आता आकाशातून नजर, इस्त्रोची नवी मोहीम फत्ते
Follow us on

श्रीहरीकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्त्रोमार्फत आज सकाळी 9.27 च्या सुमारास 28 नवीन उपग्रह अवकाशात झेपावलं आहे. या उपग्रहात भारताचा एक, अमेरिकेचे 24, लुथानियाचे 2 तर स्पेन आणि स्विजर्झलँडचे प्रत्येकी एक अशा 28 उपग्रहांचा समावेश आहे. या उपग्रहांमार्फत आकाशातून दहशतवाद्यांवर नजर ठेवता येणार आहे.

ही अवकाश मोहीम पूर्ण होण्यासाठी 180 मिनिटांचा अवधी लागणार आहे. PSLV-C-45 या अवकाशयानाने सकाळी 9.27 मिनिटांनी आकाशात उड्डाण घेतले. यात 28 उपग्रहांचा समावेश असून याचे साधारण वजन 220 किलोग्रॅम आहे.

श्रीहरीकोटा मधील सतीश धवन केंद्रातून PSLV-C-45 आज अवकाशात झेपावलं आहे. EMI-SAT असे अवकाशात झेपवणाऱ्या मुख्य उपग्रहाचे नाव आहे. विशेष म्हणजे इस्त्रोद्वारे पहिल्यांदाच पृथ्वीच्या तीन विविध कक्षामध्ये 28 उपग्रह झेपावले आहेत. या मोहिमेसाठी इस्त्रोने सकाळी 6.27 मिनिटांनी इस्त्रोद्वारे काऊंटडाऊनही सुरु केले होते. तसेच इस्त्रोच्या इतिहासात पहिल्यांदाच क्रिकेट मॅचप्रमाणे ही अवकाश भरारी प्रेक्षकांना लाईव्ह पाहता आली. यासाठी इस्त्रोद्वारे श्रीहरीकोटाच्या सतीश धवन केंद्रात 5000 लोकांची खास बैठक व्यवस्था करण्यात आली होती. इस्त्रोने सुरु केलेल्या या लाईव्ह अवकाश भरारीचा थरार आज 1000 लोकांनी प्रत्यक्ष अनुभवला.

PSLV-C-45 हे इस्त्रोचे सर्वाधिक सुरक्षित अवकाशयान आहे. याद्वारे आतापर्यंत 47 अवकाश भरारी घेण्यात आल्या आहेत. याच सॅटेलाईटद्वारे 15 मार्च 2017 रोजी फक्त 30 मिनिटात सात देशातील 104 उपग्रहांनी अवकाश भरारी घेतली होती. त्यानंतर या सॅटेलाईटचे नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नमूद झाले होते. याआधी 2014 साली 37 उपग्रह अवकाशात सोडण्यात आले  होते.

मोहिमेचे वैशिष्ट्ये:

  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था या दोघांनी एकत्रित मिळून EMI-SAT हा उपग्रह तयार केला आहे.
  • पाकिस्तानच्या सीमारेषेवर नजर ठेवण्यासाठी हा उपग्रह तयार करण्यात आला आहे.
  • हा उपग्रह सीमारेषेवर रडार किंवा सेन्सरप्रमाणे काम करणार आहे.
  • केवळ मानवनिर्मिती हालचाली नाही तर अंतराळातील सर्व हालचालींवर याद्वारे नजर ठेवता येणार आहे.