जेट एअरवेजची विमानसेवा ठप्प, प्रवाशांचा खोळंबा 

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या जेट एअरवेजची अनेक उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचा समावेश आहे. काल रात्रीपासून जेटची सर्व उड्डाण अनिश्चित काळासाठी बंद करत असल्याचे जेट एअरवेजने सांगितले आहे. जेट एअरवेजने विमान उड्डाण रद्द केल्याने अनेक प्रवाशी विमानतळावर खोळंबले आहेत. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, जेट एअरवेज काल रात्रीपासून […]

जेट एअरवेजची विमानसेवा ठप्प, प्रवाशांचा खोळंबा 
Follow us on

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या जेट एअरवेजची अनेक उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचा समावेश आहे. काल रात्रीपासून जेटची सर्व उड्डाण अनिश्चित काळासाठी बंद करत असल्याचे जेट एअरवेजने सांगितले आहे. जेट एअरवेजने विमान उड्डाण रद्द केल्याने अनेक प्रवाशी विमानतळावर खोळंबले आहेत.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, जेट एअरवेज काल रात्रीपासून आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द करत असल्याची कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही. प्रवाशी विमानतळावर पोहोचल्यानंतरही त्यांना याबाबत काहीच कल्पना नव्हती. यामुळे अनेक प्रवाशी विमानाची विमानतळावर तात्कळत उभे होते. त्यानंतर कित्येक तासांनी विमान उड्डाण रद्द करण्यात आल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. तसेच सर्व प्रवाशांना तिकिटांची रक्कम परत देण्यात येईल अशीही घोषणा करण्यात आली.

दरम्यान, आतापर्यंत जेट एअरवेजने मुंबई – कोलकाता, कोलकाता – गुवाहाटी आणि डेहरादून – गुवाहाटी यांसह विविध विमानाची उड्डाण रद्द केली आहेत. काल जेट एअरवेजच्या फक्त 14 विमानांनी आकाशात उड्डाणं घेतली आहे. सध्या जेट एअरवेज आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. थकलेले कर्ज, विलंबाने दिले जाणारे भाडे, इंधन विक्रेत्यांना उशिरा दिले जाणारे पैसे ही यामागची काही प्रमुख कारणे आहे. विशेष म्हणजे जेट एअरवेजला इंधन पुरवठा करणाऱ्या इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने 10 एप्रिलपासून नवी दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद विमानतळावर इंधन पुरवठा बंद केला आहे.

जेट एअरवेजने रद्द केलेल्या विमान उड्डाणामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. जेट एअरवेजच्या कोणत्याही प्रवाशाची गैरसोय होऊ नये, याची काळजी वाहतूक मंत्रालयाने घ्यावी, असे  केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी नागरी वाहतुक मंत्रालयाला आदेश दिले आहेत.

जेट एअरवेजच्या विमान उड्डाणाला कमर्शियल इंटेलिजेंस अँड स्टॅटिस्टिक्सचे डायरेक्टरेट जनरल (Directorate General of Commercial Intelligence and Statistics) म्हणजेच डीजीसीआयकडून आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी परवानगी नाकरण्यात आली आहे. डीजीसीआयच्या नियमानुसार, ज्या कंपनीची 20 विमानं आंतरराष्ट्रीय सेवेत असतात त्यांनाच आंतरराष्ट्रीय विमानसेवेची परवानगी देण्यात येते. पण काही दिवसांपूर्वी जेट एअरवेजच्या 7 विमानांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.