जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांचा राजीनामा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

नवी दिल्ली : आर्थिक संकटात असलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक आणि चेअरमन नरेश गोयल यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीने नरेश गोयल यांच्या राजीनाम्याची अधिकृत माहिती दिली. नरेश गोयल यांनी पत्नी अनिता यांच्यासोबत 25 वर्षांपूर्वी जेट एअरवेजची स्थापना केली होती. जेट एअरवेज बोर्डाची आज सकाळी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत गोयल यांच्या राजीनाम्याची माहिती देण्यात आली. त्याशिवाय […]

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांचा राजीनामा
Follow us on

नवी दिल्ली : आर्थिक संकटात असलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक आणि चेअरमन नरेश गोयल यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीने नरेश गोयल यांच्या राजीनाम्याची अधिकृत माहिती दिली. नरेश गोयल यांनी पत्नी अनिता यांच्यासोबत 25 वर्षांपूर्वी जेट एअरवेजची स्थापना केली होती. जेट एअरवेज बोर्डाची आज सकाळी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत गोयल यांच्या राजीनाम्याची माहिती देण्यात आली. त्याशिवाय नरेश गोयल यांच्या पत्नी अनीता गोयल यांनीही जेट एअरवेजमधून काढता पाय घेतला आहे.

दुसरीकडे जेट एअरवेजला बँकांकडून तत्काळ 1,500 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. जेट एअरवेजच्या संचालक मंडळात बँक दोन सदस्यांची नेमणूक करेल. तसचे, एअरलाइनच्या दैनिक कामकाजाच्या व्यवस्थापनासाठी ‘अंतरिम व्यवस्थापन समिती’ची स्थापना केली जाईल.

नरेश गोयल यांच्या राजीनाम्यानंतर कर्जदारांनी जेट एअरवेजला आणि कंपनीच्या व्यवस्थापनाला आपल्या नियंत्रणाखाली घेतलं आहे. कर्जदारांजवळ आता जेट एअरवेजची 50.5 टक्के भागीदारी आहे. तर गोयल यांची भागीदारी 50.1 वरुन 25.5 टक्क्यांवर घसरली आहे. गोयल यांच्या राजीनाम्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जेट एअरवेजचे शेअर 12.69 टक्क्यांहून 254.50 रुपयांपर्यंत पोहोचले.

गेल्या अनेक काळापासून जेट एअरवेज आर्थिक संकटात अडकली आहे. ज्या कंपन्यांकडून त्यांनी विमानं लीजवर घेतली आहेत, त्यांचं भाडं थकित आहे. कर्ज थकितापोटी कंपनी कर्मचारी, वैमानिकांचे वेतनही वेळेवर देऊ शकत नव्हती. गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता कंपनीचे सीईओ विनय दुबे जेटला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील.

दुसरीकडे जेटला आपत्कालीन कर्ज मिळण्याचीही शक्यता आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपनीला कर्ज देऊ शकतं. यामुळे जोपर्यंत कंपनीला वाचवण्यासाठी कुठला दुसरा उपाय मिळत नाही तोवर याच कर्जावर कंपनी चालणार आहे. सुरुवातीला एसबीआय जेटला कर्ज देण्याच्या विरोधात होती. मात्र, जर जेट एअरवेजविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु झाली, तर बँकेच्या हाती काहीही लागणार नाही. कारण, जेट एअरवेजजवळ असलेल्या 119 विमानांपैकी काहीच विमानं त्यांची स्व:ची आहेत. त्यामुळे एसबीआय आता या कंपनीला कर्ज देण्यासाठी तयार झाली आहे.

जेट एअरवेजवर सध्या 26 बँकांचं 8 कोटी रुपयांचं कर्ज आहे. यापैकी काही बँका या खाजगी आहेत, तर काही परदेशी आहेत. आता या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांचंही नाव समाविष्ट होणार आहे.