अमेरिकेचे नवे अध्यक्ष बायडन यांचं भारत कनेक्शन; अनेक नातेवाईक नागपूरकर!

| Updated on: Nov 11, 2020 | 3:56 PM

अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले जो बायडन यांचे भारताशी कनेक्शन असल्याचं उघड झालं आहे. बायडन यांचे काही नातेवाईक महाराष्ट्रातील नागपूरमध्ये राहत आहेत. स्वत: बायडन यांनीही एकदा भारतात आल्यावर या गोष्टीचा खुलासा केला होता. (Joe Biden Distant Relatives Living In Nagpur)

अमेरिकेचे नवे अध्यक्ष बायडन यांचं भारत कनेक्शन; अनेक नातेवाईक नागपूरकर!
दुसऱ्यांदा त्यांनी 2008मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रयत्न केला होता.
Follow us on

नागपूर: अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले जो बायडन यांचे भारताशी कनेक्शन असल्याचं उघड झालं आहे. बायडन यांचे काही नातेवाईक महाराष्ट्रातील नागपूरमध्ये राहत आहेत. स्वत: बायडन यांनीही एकदा भारतात आल्यावर या गोष्टीचा खुलासा केला होता. (Joe Biden Distant Relatives Living In Nagpur)

आम्ही बायडन यांचे नातेवाईक आहोत, असा दावा नागपूरमध्ये राहणाऱ्या काही लोकांनी केला आहे. बायडन यांचे हे नातेवाईक हे 1873 पासून नागपूरमध्ये राहत आहेत. 2013मध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष असताना जो बायडन जेव्हा भारतात आले तेव्हा मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी त्यांचे काही नातेवाईक भारतात राहत असल्याचं म्हटलं होतं. 2013मध्ये मुंबईत आणि 2015मध्ये वॉशिंग्टन येथील एका कार्यक्रमात बायडन यांनी भाषण करताना हा खुलासा केला होता. 1972मध्ये सीनेटर बनल्यानंतर मला भारतातून एक पत्रं आलं होतं. त्यात माझे महान आजोबा ईस्ट इंडिया कंपनीत काम करत होते, असा उल्लेख होता, असं बायडन यांनी सांगितलं.

नागपूर येथे राहणाऱ्या लेस्ली बायडने यांनी हे पत्रं लिहिलं होतं. त्यांची नातवंडं नागपुरात राहत आहेत. 1873 पासून भारतात राहत असल्याचा त्यांचा दावा आहे. लेस्ली या मानसोपचार तज्ज्ञ आहेत. बायडन यांनी या निवडणुकीत चांगलं यश मिळवलं आहे, असं लेस्ली यांची नात सोनिया बायडन फ्रान्सिस यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. लेस्ली बायडन या नागपूरमध्ये राहत होत्या. 1983मध्ये त्यांचं निधन झालं. त्या नागपुरातील भारत लॉज अँड हॉस्टेल आणि भारत कॅफेच्या त्या संचालक होत्या. 28 मार्च 1981चा ‘इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’चा अंक वाचत असताना लेस्ली यांनी तत्कालीन अमेरिकन सीनेटर जो बायडन त्यांचे नातेवाईक असल्याचा उल्लेख केला होता, असं सोनिया यांनी सांगितलं. (Joe Biden Distant Relatives Living In Nagpur)

लेस्ली यांनी 15 एप्रिल 1981मध्ये एक पत्र पाठवून बायडन यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर 30 मे 1981 रोजी बायडन यांनीही लेस्ली यांना उत्तर दिलं होतं. भारतातून पत्रं मिळाल्यानंतर बायडन आनंदित झाले होते. या पत्रातून त्यांनी बायडन कुटुंबाच्या वंशावळीचीही चर्चा केली होती, असंही सोनिया यांनी सांगितलं.

सोनिया यांचे मोठे बंधू इयान बायडन (वय 44) हे नागपूरमध्येच राहत आहेत. ते मर्चंट नेव्हीतील माजी अधिकारी आहेत. लेस्ली आणि जो बायडन यांच्यात आमचे पूर्वज जॉन बायडन आणि त्यांची पत्नी अॅनी ब्यूमोंट यांच्याबाबत चर्चा केली होती, असं इयान यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडन यांचं अभिनंदन करण्यास चीनचा नकार

जो बायडन यांच्या विजयाचा भारत अमेरिका मैत्रीला फायदा की तोटा?, बायडन- हॅरिस यांची जुनी वक्तव्यं काय सांगतात?

(Joe Biden Distant Relatives Living In Nagpur)