शिवसेना आमदाराच्या घरातच मराठा आंदोलकांचं ठिय्या आंदोलन

| Updated on: Oct 05, 2020 | 2:32 PM

विद्यमान सरकारला ते आरक्षण टिकवता आलेलं नाही, अशी टीका भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली. (Kalyan Maratha community activist Protest in Shivsena MLA House) 

शिवसेना आमदाराच्या घरातच मराठा आंदोलकांचं ठिय्या आंदोलन
Follow us on

कल्याण :विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण टिकले होते. मात्र विद्यमान सरकारला ते आरक्षण टिकवता आलेलं नाही, अशी टीका भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी आज कल्याण पश्चिमेकडील शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या घरी ठिय्या आंदोलन केले. (Kalyan Maratha community activist Protest in Shivsena MLA House)

महाविकासआघाडीचे सरकार मराठा समाजाच्या बरोबरीने काम करण्यास तयार नाही. त्यामुळे मराठा आरक्षण कोर्टात टिकलं नाही, असेही गणपत गायकवाड म्हणाले. आज मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी संजय मोरे, धंनजय जोगदंड यांच्यासह काही महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार गायकवाड यांची भेट घेतली.

यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी आरक्षणाला पाठिंबा द्यावा या मागणीसाठी निवेदन दिले. त्यानंतर आमदार गायकवाड यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकारिणीला पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली.

मराठा कार्यकर्त्यांचा शिवसेना आमदाराच्या घरी ठिय्या 

तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी आज कल्याण पश्चिमेकडील शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या घरी ठिय्या आंदोलन केले. यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली. मात्र आमदार काही कामानिमित्त बाहेर गेले असल्याने त्यांची कार्यकर्त्यांशी भेट झाली नाही.

तेव्हा आमदारांचे बंधू नगरसेवक प्रभूनाथ भोईर यांना मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी आमदारांचा मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्यात आल्याचे पत्र दिले गेले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी अरविंद मोरे, श्याम आवारेसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. (Kalyan Maratha community activist Protest in Shivsena MLA House)

संबंधित बातम्या : 

मराठा समाज MPSC परीक्षांवरून आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पत्रातून शेवटचा अल्टिमेटम

काँग्रेसने शब्द पाळला, BMC च्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच