KBC 12 | मनृस्मृती विषयी प्रश्न, बिग बी आणि ‘सोनी’विरोधात भाजप आमदार अभिमन्यू पवारांची तक्रार

| Updated on: Nov 03, 2020 | 12:05 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी कोणता धर्मग्रंथ जाळला होता? या प्रश्नावरुन वाद निर्माण झाला आहे

KBC 12 | मनृस्मृती विषयी प्रश्न, बिग बी आणि सोनीविरोधात भाजप आमदार अभिमन्यू पवारांची तक्रार
Follow us on

लातूर : ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) तसेच सोनी वाहिनीविरोधात (Sony TV) तक्रार दाखल करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार ( BJP MLA Abhimanyu Pawar) यांनी पोलिसांना यासंदर्भात लेखी तक्रार दिली आहे. मनुस्मृतीविषयी (Manusmruti) प्रश्न विचारुन हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप अभिमन्यू पवार यांनी केला आहे. (FIR against Amitabh Bachchan and KBC makers for question related to Manusmriti)

‘कौन बनेगा करोडपती’च्या 30 ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या भागात बेजवाडा विल्सन आणि अनुप सोनी सहभागी झाले होते. यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे वाद निर्माण झाला आहे. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी कोणता धर्मग्रंथ जाळला होता? असा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी विचारला. विष्णुपुराण, श्रीमद्भगवद्गीता, ऋग्वेद आणि मनुस्मृती असे पर्याय देण्यात आले होते.

“धर्म म्हटलं की भारतात अनेक धर्म आहेत. त्यामुळे पर्यायांमध्ये चारही धर्म आले पाहिजे होते. परंतु विष्णूपुराण, श्रीमद्भगवद्गीता, ऋग्वेद, मुनस्मृती अशा फक्त हिंदू धर्मीयांशी निगडित धर्मग्रंथांचा उल्लेख करण्यात आला. बाकीच्या धर्मांच्या ग्रंथांचा समावेश पर्यायांमध्ये का केला नाही?” असा सवाल अभिमन्यू पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना विचारला.

“यामागे मोठा कटकारस्थान आहे. देशातील दोन समाजांना एकमेकांमध्ये भिडायला लावण्याचं काम सोनी वाहिनी आणि अमिताभ बच्चन करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करत आहोत. 298 अ, 153, 290 अशा अनेक कलमांअंतर्गत कारवाई करणे शक्य आहे. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल होईल” असेही अभिमन्यू पवार म्हणाले.

“सामाजिक सलोखा बिघडवणं, हिंदू-बौद्ध धर्मात तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. मुळात हा प्रश्न विचारण्याचीच गरज नव्हती. जाणीवपूर्वक या विषयाला हात घातला आहे” असा आरोपही अभिमन्यू पवार यांनी केला.

कोण आहेत अभिमन्यू पवार?

अभिमन्यू पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही आधी काम पाहिले आहे. लातूरमध्ये भाजयुमोचे ते नेते आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूरमधील औसा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले. (FIR against Amitabh Bachchan and KBC makers for question related to Manusmriti)

संबंधित बातम्या :

…म्हणून वडिलांसाठी अवयवदान करता आलं नाही, केबीसीमध्ये रितेश भावूक

Asmita Gore | महाराष्ट्राची कन्या अवघ्या देशाची प्रेरणा, केबीसीमंचावर अस्मिताचे अभूतपूर्व यश!

(FIR against Amitabh Bachchan and KBC makers for question related to Manusmriti)