कर्जबाजारी झालो तरी चालेल, पण स्व:खर्चाने खड्डे बुजवल्याशिवाय राहणार नाही, केडीएमसीतील अपक्ष नगरसेवकाचा निर्धार

| Updated on: Oct 04, 2020 | 5:06 PM

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी स्वखर्चाने खड्डे बुजवण्याचे काम सुरु केले आहे.(KDMC Corporator fill potholes from own money) 

कर्जबाजारी झालो तरी चालेल, पण स्व:खर्चाने खड्डे बुजवल्याशिवाय राहणार नाही, केडीएमसीतील अपक्ष नगरसेवकाचा निर्धार
Follow us on

कल्याण : दरवर्षी कल्याण-डोंबिवलीत पावसाळ्यात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यातील खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहे. मात्र तरीही प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी स्वखर्चाने खड्डे बुजवण्याचे काम सुरु केले आहे. कर्जबाजारी झालो तरी चालेल, मात्र स्व:खर्चाने खड्डे बुजवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार केला आहे. (KDMC Corporator fill potholes from own money)

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात खड्डयामुळे नागरिक त्रस्त आहे. गेल्या काही दिवसात अनेक अपघात झाले आहेत. वारंवार तक्रारी करुन सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही. कल्याण ग्रामीणमधील काही भाग यापूर्वी महापालिका हद्दीत येत होता. मात्र आता वगळेल्या गावात त्याचा समावेश झाला आहे. त्यामुळे या नव्या भागाची नव्याने नगरपरिषद स्थापन करण्यात आली आहे.

मात्र सध्या या भागाकडे पालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याचा फटका त्या भागाला सहन करावा लागत आहे. या ठिकाणी दररोज अनेक अपघात घडत असतात. त्यामुळे कित्येक जण जखमी झाले आहे. मात्र तरीही याबाबत काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.

त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी स्व: खर्चाने खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी कजर्बाजारी झालो तरी चालेल. मात्र नागरिकांसाठी रस्ते खड्डेमुक्त करु, असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आता तरी महापालिकेला जाग येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (KDMC Corporator fill potholes from own money)

संबंधित बातम्या : 

चलनी नोटांद्वारे व्हायरसचा संसर्ग शक्य; RBI चे संकेत

धनगर आरक्षणासाठी पडळकर आक्रमक, सरकारला रक्ताच्या 10 हजार बाटल्या पाठवणार