काय आहे LEO सॅटेलाईट आणि त्याला पाडणारी भारताची ASAT यंत्रणा?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

Mission Shakti नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी यांनी आज ट्विट करत महत्त्वाची माहिती देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर देशभरात याविषयी उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर मोदींनी भारताच्या ASAT यंत्रणेने एक LEO  सॅटेलाईट (satellite ) पाडल्याची घोषणा केली. यानंतर अनेकांना LEO  सॅटेलाईट आणि ASAT यंत्रणा काय आहे असा प्रश्न पडला आहे. जाणून घेऊयात याविषयी .. LEO सॅटेलाईट ‘लो […]

काय आहे LEO  सॅटेलाईट आणि त्याला पाडणारी भारताची ASAT यंत्रणा?
Follow us on

Mission Shakti नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी यांनी आज ट्विट करत महत्त्वाची माहिती देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर देशभरात याविषयी उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर मोदींनी भारताच्या ASAT यंत्रणेने एक LEO  सॅटेलाईट (satellite ) पाडल्याची घोषणा केली. यानंतर अनेकांना LEO  सॅटेलाईट आणि ASAT यंत्रणा काय आहे असा प्रश्न पडला आहे. जाणून घेऊयात याविषयी ..

LEO सॅटेलाईट

‘लो अर्थ ऑरबिट सॅटेलाईट’ (LEO सॅटेलाईट) संदेशवहन क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे सॅटेलाईट अत्यंत कमी ऊर्जेत इतर सॅटेलाईटला अंतराळाच्या खालच्या भ्रमण कक्षेत पाठवते. त्यामुळे या सॅटेलाईटमध्ये कमी क्षमतेच्या अॅम्प्लिफायरमध्येही यशस्वी काम करता येते. या सॅटेलाईटचा वापर अंतराळातील कर्मचारी आणि इतर सेवांसाठीही केला जातो. याचं वैशिष्ट्यामुळे LEO चा उपयोग अनेक संदेशवहन कामांसाठी केला जातो.

ASAT यंत्रणा

अँटी सॅटेलाईट (ASAT) यंत्रणा ही अंतराळातील शस्त्र असून याचा वापर अंतराळातील सॅटेलाईट निकामी करण्यासाठी, उद्ध्वस्त करण्यासाठी होतो. जगभरात ही यंत्रणा अमेरिका, चीन आणि रशिया यांच्याकडेच होती. मात्र, आता भारतानेही ही क्षमता प्राप्त केली आहे. कोणत्याही देशाने ही यंत्रणा युद्धादरम्यान वापरलेली नाही. मात्र, काही देशांनी आपली शक्ती दाखवण्यासाठी आपलेच निकामी सॅटेलाईट पाडल्याची उदाहरणे याआधीही पाहायला मिळाले आहे. त्यामुळे भारतानेही अशाचप्रकारे शक्तीप्रदर्शन केल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

आमच्या वैज्ञानिकांनी अंतराळात 300 किमी दूर LEO (Low Earth Orbit) मध्ये एक लाईव्ह सॅटेलाईट पाडलं. हे लाईव्ह सॅटेलाईट पूर्वनियोजित लक्ष्य होतं. त्याला अँटी सॅटेलाईट मिसाईल (A-SAT) द्वारे पाडण्यात आलं, असं मोदी म्हणाले. भारतीय वैज्ञानिकांनी या मिशनअंतर्गत सर्व लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले. या मोहिमेसाठी भारतीय बनावटीच्या सॅटेलाईटचा वापर करण्यात आला होता.