LIVE : ठाकरे पिता-पुत्रांचा दुष्काळी दौरा

| Updated on: Jun 09, 2019 | 10:11 AM

राज्यासह देशातील प्रत्येक घडामोडीच्या अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर...

LIVE :  ठाकरे पिता-पुत्रांचा दुष्काळी दौरा
Follow us on

[svt-event title=” ठाकरे पिता-पुत्रांचा दुष्काळी दौरा” date=”09/06/2019,9:55AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : ठाकरे पिता-पुत्र आज दुष्काळी दौऱ्यावर, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जालन्यात तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सांगोल्यात दुष्काळी दौऱ्यावर [/svt-event]

[svt-event title=”कारंज्यात घोटभर पाण्यासाठी नागरिकांची जीवघेणी कसरत” date=”09/06/2019,9:58AM” class=”svt-cd-green” ] वर्धा : कारंजा तालुक्यातील येनगाव येथे घोटभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत, पाण्यासाठी ग्रामस्थांना विहिरीत उतरावं लागतं, दिवसरात्र विहिरी, कुपनलिकांवर गर्दी, तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई [/svt-event]

[svt-event title=”साताऱ्यात मुसळधार पावसाला सुरुवात” date=”09/06/2019,9:59AM” class=”svt-cd-green” ] सातारा : शहरासह ग्रामीण भागात पहाटेपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात, वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित, मात्र उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात पावसाच्या सरी” date=”09/06/2019,9:59AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : शहर आणि जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात, उकाड्याने हैराण झालेले नागरिक सुखावले [/svt-event]

[svt-event title=”अकोल्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस” date=”09/06/2019,10:02AM” class=”svt-cd-green” ] अकोला : जिल्ह्यात सकाळपासून पावसाला जोरदार सुरुवात, आपातापा, दोनवाडा, खिरपुरी, रिधोरा, बार्शीटाकळी, शिवणी या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पावसामुळे वातावरणात गारवा [/svt-event]

[svt-event title=” ढोकळा खाल्ल्याने पाच चिमुकल्यांना विषबाधा, प्रकृती गंभीर” date=”09/06/2019,10:01AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : खेड शहरातील मुख्य बाजारपेठेत मिठाईच्या दुकानातील ढोकळा खाल्ल्याने 5 मुलांना विषबाधा, आजीने बाजारातून आणलेला ढोकळा खाल्ल्यानंतर मुलांना अस्वस्थ वाटू लागलं, मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु, प्रकृती गंभीर [/svt-event]

[svt-event title=”विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयावर हल्ला, दोघांना अटक” date=”09/06/2019,10:05AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील कार्यालयावरील हल्ल्या प्रकरणी दोघांना अटक, भोसरी पोलिसांची कारवाई [/svt-event]