Live Update | राहाता नगरपालिकेत कोरोनाचा शिरकाव, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 23 कर्मचाऱ्यांना कोरोना

| Updated on: Aug 25, 2020 | 6:01 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर

Live Update |  राहाता नगरपालिकेत कोरोनाचा शिरकाव, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 23 कर्मचाऱ्यांना कोरोना
Follow us on

[svt-event title=”राहाता नगरपालिकेत कोरोनाचा शिरकाव, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 23 कर्मचाऱ्यांना कोरोना” date=”25/08/2020,5:54PM” class=”svt-cd-green” ] शिर्डी : राहाता नगरपालिकेत कोरोनाचा शिरकाव, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 23 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, सोमवारी दोघे जण आढळून आल्यानंतर सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी केली, राहाता नगरपालिका सात दिवसांसाठी बंद, अजूनही काही कर्मचाऱ्यांचा अहवाल येणे बाकी, पालिकेतील अधिकारी कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ [/svt-event]

[svt-event title=”फलटण येथील निकोप रुग्णालय प्रशासनाकडून कोव्हिड रुग्णांसाठी अधिग्रहित केल्यामुळे सामान्य रुग्ण संतप्त” date=”25/08/2020,5:56PM” class=”svt-cd-green” ] सातारा : फलटणमध्ये रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांचा गोंधळ, फलटण येथील निकोप रुग्णालय प्रशासनाकडून कोव्हिड रुग्णांसाठी अधिग्रहित केल्यामुळे सामान्य रुग्ण संतप्त, संतप्त झालेल्या रुग्णांची आणि पोलिसांची रुग्णालयाबाहेर धरपकड, सामान्य रुग्णांची जबाबदारी कोण घेणार, संतप्त रुग्णांचा प्रशासनाला सवाल [/svt-event]

[svt-event title=”वर्ध्यात 21 लाभार्थ्यांकडून बोगस जात प्रमाणपत्रावर आवास योजनेचा लाभ, गुन्हा दाखल” date=”25/08/2020,5:49PM” class=”svt-cd-green” ] वर्धा : 21 लाभार्थ्यांकडून बोगस जात प्रमाणपत्रावर आवास योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल, सावंगी पोलिसात 21 जणांवर गुन्हा दाखल, उमरी (मेघे) ग्रामपंचायतील प्रकार, वर्धा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडून तक्रार, रमाई घरकुल योजनेचा लाभ घेत लाटल साडेसोळा लाखांचं अनुदान, या घटनेमुळं विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची चौकशी करण्याची मागणी [/svt-event]

[svt-event title=”बीडमध्ये पावडर कोटिंगच्या कारखान्यात भीषण स्फोट, एकाचा मृत्यू ” date=”25/08/2020,5:46PM” class=”svt-cd-green” ] बीड : पावडर कोटिंगच्या कारखान्यात भीषण स्फोट, स्फोटात एकाचा मृत्यू, तीन जण गंभीर, गिराम कारखान्यातील घटना, संतोष गिराम यांचा उपचारादरम्यान मृत्यू, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु, स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट [/svt-event]

[svt-event title=”पोलीस असल्याची बतावणी करुन 57 वर्षीय महिलेला गंडा, 3 लाखांचे दागिने लंपास” date=”25/08/2020,9:04AM” class=”svt-cd-green” ] नालासोपारा : नालासोपाऱ्यात पोलीस असल्याची बतावणी करुन 57 वर्षीय महिलेला गंडा, 3 लाख 11 हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन फरार, तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत 12 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार” date=”25/08/2020,9:02AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबादेत 12 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार, लोकसंख्येनुसार 1 लाख 70 हजार लोकांमध्ये अँटिबॉडी तयार, सिरो सर्वेक्षणाच्या अहवालातून माहिती समोर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती, स्लम एरियात 14 टक्के तर इतर एरियात 10 टक्के अँटिबॉडी तयार, हायरिस्क झोन मध्ये 63 टक्के ते 49 टक्के अँटिबॉडी तयार, तर औरंगाबादच्या पाच वार्डात 0 टक्के अँटिबॉडी तयार, अजूनही औरंगाबाद शहरावर कोरोनचा धोका कायम [/svt-event]

[svt-event title=”राज्यात कोरोनाचा मोतीबिंदू शस्त्रक्रियांना मोठा फटका, मार्चपासून राज्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया बंद” date=”25/08/2020,9:00AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा मोतीबिंदू शस्त्रक्रियांना मोठा फटका, मार्चपासून राज्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया बंद, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया न झाल्यामुळे अनेकांना काचबिंदू होण्याचा धोका, काचबिंदू झाल्यानंतर येऊ शकतं कायमचं अंधत्व, दर महिन्याला एका जिल्ह्यात 300 ते 500 शस्त्रक्रिया होतात, शस्त्रक्रिया ठप्प झाल्यामुळे अनेकांना येऊ शकते कायमचे अंधत्व [/svt-event]

[svt-event title=”‘केंद्राचा निर्णय काहीही असो, राज्यात ई- पासची गरज’ – विजय वडेट्टीवार” date=”25/08/2020,8:56AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : प्रवासासाठी राज्यात काही काळ ई-पासची आवश्यकता, रुग्णवाढीमुळे ई-पासची गरज असल्याची सरकारची भूमिका, कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती, ई-पास रद्द केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, सर्वांना मुक्त संचार करता आल्यास रुग्णवाढ वेगानं होतील, तर नागपुरात लोकं रस्त्यावर मरतील, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भिती व्यक्त केली [/svt-event]

[svt-event title=”नाशकात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार” date=”25/08/2020,8:52AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : शहरात कोरोनाचा धोका वाढला, कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या पार, शहरात 4003 प्रतिबंधित क्षेत्र, महापालिका प्रशासनाकडून गणेशोत्सव काळात प्रसार वाढू नये यासाठी विशेष प्रयत्न [/svt-event]

[svt-event title=”जायकवाडी धरणाने 80 टक्क्यांची पाणीपातळी ओलांडली” date=”25/08/2020,8:51AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : जायकवाडी धरणाने 80 टक्क्यांची पाणीपातळी ओलांडली, जायकवाडी धरणात तब्बल 80.67 टक्के पाणीसाठा, जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु, 16 हजार क्यूसेक्स ने जायकवाडी धरणात आवक सुरु, गोदावरी नदी दुथडी भरुन वाहू लागली, गोदावरी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा [/svt-event]