राज्यात 11 महिन्यात 30 हजार अपघात, 11 हजार लोकांचा मृत्यू

| Updated on: Dec 22, 2019 | 3:59 PM

गेल्या 11 महिन्यात तब्बल 11, 000 जणांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे

राज्यात 11 महिन्यात 30 हजार अपघात, 11 हजार लोकांचा मृत्यू
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात रस्ते अपघातात जीव गमावलेल्यांचा आकडा ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 11 महिन्यात 11 हजाराहून जास्त जणांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे (Maharashtra Road Accident Report). महाराष्ट्रात जानेवारी ते नोव्हेंबर ह्या काळात तब्बल 30 हजार 80 अपघात झाले आहेत. यामध्ये 11 हजार 387 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 26 हजार 428 जण जखमी झाले आहेत (Maharashtra Road Accident Report).

2018 मध्ये राज्यात 32 हजार 493 अपघात झाले. ज्यात 12 हजार 14 जणांचा मृत्यू आणि 28 हजार 740 जण जखमी झाले होते. परिवहन विभागाने रस्त्यावरील अपघातग्रस्त ठिकाणांचं सर्वेक्षण केलं असून त्यामध्ये ही धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत रस्ते अपघातांमध्ये 7 टक्क्यांनी घटलं आहे. 1 ऑगस्ट ते 16 डिसेंबर ह्या काळात चालकांनी बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. तसेच सर्वात जास्त अपघात राज्य महामार्गावर झाले आहेत. विशेष म्हणजे या साडेचार महिन्यात मुंबई, पुणे महामार्गावर सर्वात कमी अपघात झाले असले, तरी अपघातातील मृत्यूदर हा 6 पटीने वाढला आहे.

गेल्या 11 महिन्यांत सर्वाधिक मुंबईत 2, 604 अपघात झाले आहेत. पुण्यामध्ये 1, 638, अहमदनगरमध्ये 1,494 तर नाशिकमध्ये 1,250 इतके अपघात झाले आहेत. राज्यभरातील रस्त्यांवर 1,326 ब्लॅक स्पॉट अर्थात अपघातप्रवण श्रेत्रे आहेत. अशा ठिकाणांवर कायम स्वरूपी उपायोजना करण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न केले जात असले, तरीही दुसरीकडे वाहन चालकांनीही काळजी घेण्याची गरज आहे.

Maharashtra Road Accident Report