दिल्लीतील अनाज मंडीमध्ये भीषण आग, 43 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

| Updated on: Dec 08, 2019 | 1:49 PM

दिल्लीतील फिल्मिस्थान येथे 3 कारखान्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे (Major Fire in 3 factory of Delhi). या आगीत आत्तापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

दिल्लीतील अनाज मंडीमध्ये भीषण आग, 43 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीतील फिल्मिस्थान येथे अनाज मंडीतील 3 कारखान्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे (Major Fire in 3 factory of Delhi). या आगीत आत्तापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अग्निशामक दलाच्या मदतीने जवळपास 59 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत (Major Fire in 3 factory of Delhi).

दिल्लीच्या झाशी चौकातील अनाज मंडी येथे 3 कारखान्यांना आग लागली. आग लागण्यामागील नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. अग्निशामक दलाच्या 30 गाड्या घटनास्थळावर आग विझवण्याचं काम करत आहेत. 3 कारखान्यांना एकाचवेळी आग लागल्याने आगीचं स्वरुप मोठं होतं. संबंधित कारखान्यांमध्ये कागदाचे बॉक्स बनवण्याचं काम होत होतं. त्यातच ही आग लागली. कागदाचं मोठं प्रमाण असल्यानं आग काही वेळातच प्रचंड वाढली आणि संपूर्ण इमारत आगीने वेढली गेली.

कारखान्यात काम करुन रात्रीच्यावेळी तेथेच राहणाऱ्या मजूरांचं प्रमाण मोठं होतं. त्यामुळेच आगीत मृत्यू झालेल्यांमध्ये मजुरांचं प्रमाण अधिक आहे. अनाज मंडी येथील संबंधित तिन्ही कारखाने एकमेकांना जोडलेले असून 6 मजली इमारतीत आहेत. आगीमागे शॉर्ट सर्किटचं कारण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आत्तापर्यंत जवळपास 43 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दिल्लीतील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आगाीच्या धुरामुळे श्वास गुदमरल्याने अनेक मजूरांची स्थिती नाजूक आहे.

संबंधित बाजारात देशभरातून धान्याची आयात निर्यात होते. त्यामुळे हा परिसर नेहमीच गर्दीने भरलेला असतो. आगीची घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने तुलनेने कमी हानी झाली. अग्निशामक दल आगीत सापडलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.