मालेगावात मुसळधार पाऊस, 25 वर्षांपूर्वीचा बंधारा फुटला, अनेक गावात पाणी शिरलं

| Updated on: Sep 12, 2020 | 7:49 PM

मालेगावात असलेल्या अतिवृष्टीमुळे वळवाडे भागात असलेला कलमदरा बंधारा फुटला. (Malegaon Bandhara break flooded situation in village)

मालेगावात मुसळधार पाऊस, 25 वर्षांपूर्वीचा बंधारा फुटला, अनेक गावात पाणी शिरलं
Follow us on

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. मालेगावात असलेल्या अतिवृष्टीमुळे वळवाडे भागात असलेला कलमदरा बंधारा फुटला. त्यामुळे वळवाडे, आंबसन, गारेगाव, वाघखोरे यासह इतर अनेक गावात पाणी शिरले. हा बंधारा फुटल्याने ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होऊन पुराच्या पाण्यात सुमारे 175 पेक्षा जास्त जनावरे वाहून गेली. (Malegaon Bandhara break flooded situation in village)

तर 230 हेक्टरवरील मका, बाजरी, ऊस यासह इतर पिके उद्धवस्त झाली आहे. अनेक कांदा चाळीतदेखील पाणी शिरल्यामुळे शेकडो टन कांदा भिजून खराब झाला आहे. या बंधारा फुटीचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले.

अचानक पाण्याचा लोंढा आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे जीव वाचवले. मात्र आमची जनावरे आणि पिके डोळ्यादेखत वाहून गेले, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा बंधारा फुटल्याची माहिती मिळताच पाटबंधारे आणि महसूल विभागाचे अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीन मदतकार्य सुरु केले. हा बंधारा सुमारे 25 वर्षापूर्वी बांधण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बंधाऱ्याला भगदाड का पडले याची चौकशी करण्यात येणार आहे. याशिवाय नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार सी.आर.राजपूत यांनी दिले. (Malegaon Bandhara break flooded situation in village)

संबंधित बातम्या : 

राज्यातील गावं दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट असफल, जलयुक्त शिवार योजनेवर कॅगचा ठपका

संगमनेरमध्ये पुणे-नाशिक महामार्गावर 29 प्रकारच्या 2373 झाडांची कत्तल, हरित न्यायाधिकरणाकडून गंभीर दखल