Man Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली? मोदींकडून खुलासा

| Updated on: Aug 25, 2019 | 5:09 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेअर ग्रिल्स डिस्कवरी चॅनलवर ‘मॅन वर्सेज वाईल्ड’च्या विशेष एपिसोडमध्ये सोबत दिसले. याविषयी सर्वाधिक लोक विचारत असलेला प्रश्न संपूर्ण कार्यक्रमात मोदी हिंदीत बोलत होते, मग इंग्लिश समजू शकणाऱ्या बेअरला ते काय म्हणत होते हे कसं कळलं?

Man Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली? मोदींकडून खुलासा
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेअर ग्रिल्स डिस्कवरी चॅनलवर ‘मॅन वर्सेज वाईल्ड’च्या विशेष एपिसोडमध्ये सोबत दिसले. हा शो जगभरात सर्वाधिक ट्रेंडिंग टेलिव्हिजन इव्हेंट ठरला आहे. जंगलामध्ये होणाऱ्या साहसी कृतींच्या या शोवर अजूनही बरिच चर्चा होत आहे. यात सर्वाधिक लोक विचारत असलेला प्रश्न संपूर्ण कार्यक्रमात मोदी हिंदीत बोलत होते, मग इंग्लिश समजू शकणाऱ्या बेअरला ते काय म्हणत होते हे कसं कळलं?

अनेकांच्या मनात असलेल्या या प्रश्नावर स्वतः पंतप्रधान मोदींनीच खुलासा केला आहे. रेडिओवर प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांनी या विषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘अनेकजणांना बेअर गिल्सला माझी हिंदी कशी समजत होती हा प्रश्न आहे. अनेकांनी तर या व्हिडीओत एडिटींग केले असावे किंवा खूप वेळा शुटिंग केले असावे असंही म्हटलं. मात्र, तसं काहीही झालेलं नसून माझ्या आणि बेअर ग्रिल्समध्ये तंत्रज्ञानाने पूल बांधला. बेअर ग्रिल्सच्या कानात एक कॉर्डलेस डिव्हाईस बसवण्यात आलं होतं. त्यामुळे माझे हिंदीतील संभाषण बेअर ग्रिल्सला तात्काळ इंग्लिशमध्ये अनुवादित होऊन समजायचे.”

‘मॅन वर्सेज वाईल्ड’ हा विशेष एपिसोड 12 ऑगस्टला प्रदर्शित करण्यात आला. हा शो देशातच नाही, तर जगभरात पाहिला गेला. बेअर ग्रिल्सने याची माहिती देत स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे.


बेअर ग्रिल्स म्हणाला, “पंतप्रधान मोदींसोबत मॅन Vs वाईल्डचा एपिसोड अधिकृतपणे जगातील सर्वाधिक ट्रेंडिंग टेलिव्हिजन इव्हेंट ठरला. 3.6 बिलिअन लोकांनी हा शो पाहिला. त्याने सुपर बॉल इव्हेंटला देखील मागे टाकले आहे. या शोने 3.4 बिलिअन सोशल इंप्रेशन तयार केले. हा शो पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार.”