सोनिया गांधींवर दानवेंची एकेरी भाषेत टीका, काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर

| Updated on: Nov 01, 2020 | 9:20 PM

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्यानंतर काँग्रेसने देखील दानवेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सोनिया गांधींवर दानवेंची एकेरी भाषेत टीका, काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर
Follow us on

यवतमाळकेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्यानंतर काँग्रेसने देखील दानवेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दानवेंना प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी अशा प्रकारचे स्टेटमेंट करावे लागतात, असा बोचरा वार केला आहे. (Manikrao Thakre reply Raosaheb Danve)

“रावसाहेब दानवेंना प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी अश्या प्रकारची वक्तव्य करावी लागतात. या देशासाठी काँग्रेस पक्षाचा तसंच काँग्रेस नेतृत्वाचा त्याग आहे. जवाहरलाल नेहरु 13 वर्ष जेलमध्ये राहिले, इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधींची हत्या झाली. काँग्रेसचा इतका त्याग असताना भाजपचा देशासाठी काय त्याग आहे?”, असा सवाल करत भाजप काँग्रेसशी बरोबरी देखील करु शकत नाही, असं माणिकराव ठाकरे म्हणाले.

“भाजपची भूमिका नेहमीच द्वेषाची राहिलेली आहे. देशातल्या विविध जातिधर्मांच्या लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याची यांची भूमिका राहिलेली आहे. लोकांची आपसात तंटे कसे लागतील आणि त्याचा राजकीयदृष्ट्या आपल्याला फायदा कसा होईल, हाच डाव भाजप खेळत आलं आहे, अशी टीका माणिकराव ठाकरे यांनी केली. दानवेंच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देण्याची गरज वाटत नाही, असं ठाकरे म्हणाले.

औरंगाबादमध्ये भाजपचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी पक्षकार्यकर्त्यांसमोर बोलताना रावसाहेब दानवे काँग्रेसवर घसरले. काँग्रेस ही गांधी परिवाराची पार्टी आहे. अध्यक्षपद बदलण्यासाठी काही नेत्यांनी पत्रं दिली तर पक्षाच्या नेत्यांनाच नोटीशी दिल्या गेल्या. आमच्या कुटुंबाला अध्यक्षपद नको म्हणायचं आणि पक्षनेत्यांना अश्या नोटीशी द्यायच्या अशा प्रकारची मानसिकता काँग्रेसची आहे, अशी सडकून टीका दानवेंनी केली.

रावसाहेब दानवेंनी काँग्रेसवर टीका करताना सोनिया गांधींचा एकेरी उल्लेख केला. तसंच राज्यातील महाविकास आघाडी सरकारला देखील धारेवर धरलं. हे सरकार म्हणजे अमर, अकबर अँथनीचे सरकार आहे. या सरकारविरोधात आपल्याला खंबीरपणे लढा द्यावा लागेल, असं दानवे म्हणाले.

(Manikrao Thakre reply Raosaheb Danve)

संबंधित बातम्या

कामाचा माणूस हेरुन पक्षात घ्या, भाजपला एक नंबरचा पक्ष करा, दानवेंचा कार्यकर्त्यांना बुस्टर डोस

नाथाभाऊ मूळचे ‘राष्ट्रवादी’चेच, त्यांनी पवारांच्या नेतृत्वात काम केलंय; दानवेंचा गौप्यस्फोट