Marathi : लोकसभेत मराठी आवाज कधी घुमला?, पहिलं मराठी भाषण करण्याचा मान कुणाच्या नावावर ? त्या भाषणाचा विषय काय होता?

| Updated on: Feb 27, 2022 | 6:45 AM

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रमज (Kusumagraj) यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो.

Marathi : लोकसभेत मराठी आवाज कधी घुमला?, पहिलं मराठी भाषण करण्याचा मान कुणाच्या नावावर ? त्या भाषणाचा विषय काय होता?
क्रांतिसिंह नाना पाटील
Follow us on

मुंबई : आजच्या दिवशी आपण मराठी भाषा दिवस (Marathi Language Day) साजरा करतो. मराठी भाषेविषयी अभिमानानं बोलतो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रमज (Kusumagraj) यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. मराठी भाषेचा जगात दहावा क्रमांक लागतो. मराठी भाषा महाराष्ट्रातील आणि बेळगाव, निपाणी, कारवारसह कर्नाटकात राहिललेल्या गावांमध्ये बोलली जाते. मराठी भाषिक लोक जगाच्या कााकोपऱ्यात पोहोचलेले आहेत. मराठी भाषा या लोकांच्या निमित्तानं जगभर गेलीय. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण संसदीय लोकशाही व्यवस्था स्वीकारली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संसदेत पहिल्यांदा संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या मराठी भाषेतून भाषण क्रांतिसिंह नाना पाटील (Krantisingh Nana Patil) यांनी केलं. मराठी भाषेचा आवाज संसदेच्या सभागृहात नाना पाटील यांनी मांडला. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न सोडवावा ही मागणी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली होती.

लोकसभेतील पहिल्या भाषणात संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न मांडला

स्वातंत्र्यानंतर झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातून कम्युनिस्ट पक्षाकडून क्रांतिसिंह नाना पाटील विजयी झाले होते. खासदार झाल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी मराठी भाषेतील लोकसभेतील पहिलं भाषणं केलं. ते भाषण संपूर्ण देशभर गाजल्याची माहिती आहे. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या जनतेनं क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भाषणाचं कौतुक केलं.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मराठी भाषणाचा निवडक भाग

“मराठी भाषिक लोकांच्यावर त्याचप्रमाणे गुजराथी भाषिक लोकांच्यावर सरकारने जो घोर अन्याय केला व जनतेची लोकशाही मगाणी दडपूण टाकण्याकरिता जी घोर दडपशाही केली, त्याचा निषेध करण्याकरिता मी बोलणार आहे.”

“काँग्रेसने 30 वर्ष भाषावार प्रांतरचनेीच आश्वासनं दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देऊ, म्हणून सांगितले, आम्ही त्याची वाट पाहात राहिले पण स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसनं टोपी फिरवली. तीन वेळा कमिशन व समिती नेमली. शेवटी दिले मात्र काहीच नाही. भारतात सर्वांना भाषावर प्रांत दिले. मग मराठी भाषेच्या महाराष्ट्रावरच असा अन्याय कशाकरिता? महाराष्ट्राने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळावा म्हणून लोकशाहीच्या मार्गाने व शांततेनं चळव शुरु केली, असं नाना पाटील म्हणाले होते.

सातारा जिल्हा लोकल बोर्डाकडून मानपत्र देऊन गौरवं

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी मराठी भाषेत संसदेत भाषण केल्यानंतर सातारा जिल्हा लोकल बोर्डानं त्यांचा मानपत्र देऊन गौरव केला. “1957 च्या सावर्त्रिक निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीला विजयी करण्यात आपण अविरत परिश्रम घेतलेत. उत्तर सातारा पार्लमेंट मतदारसंघातून 1 लाख 17 हजार मते देऊन जनतेने आपणास सहर्ष विजयी केले. लोकसभेत प्रथमच संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या मराठी बायबोलीत संयुक्त महाराष्ट्राचा आवाज उठवण्याचा मान आपण मिळविलात. आपल्या प्रचारामुळे मराठ्यातील निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समिती विजयी झाली व आपल्या वाणीनं शेतकरी जागा व संघटित झाला आहे, असं मानपत्र सातारा जिल्हा लोकल बोर्डानं क्रांतिसिंह नाना पाटील यांना 1958 मध्ये दिलं होतं.

इतर बातम्या:

Sambhaji Raje hunger Strike : संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा वाढला, राणा जगजीत सिंह पाटील मैदानात

माझा राजा उपाशी असताना मी घरात कसा बसू, छत्रपतींचा मावळा म्हणून इथं आलो : धैर्यशील माने