Sambhaji Raje hunger Strike : संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा वाढला, राणा जगजीत सिंह पाटील मैदानात

आता भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील (Rana Jagjit singh) उद्या 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन करतील.

Sambhaji Raje hunger Strike : संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा वाढला, राणा जगजीत सिंह पाटील मैदानात
राणा जगजीत सिंह यांचा राजेंना पाठिंबा
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 11:28 PM

उस्मानाबाद : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन राज्यभर पेटणार असल्याचे दिसून येत आहे. छत्रपती संभाजी महाराज (Sambhajiraje) यांच्या मराठा आरक्षण आमरण उपोषणला वाढता पाठिंबा मिळत आहे. कारण आता भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील (Rana Jagjit singh) उद्या 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन करतील. मराठा समाजाचा अंत पाहू नका , सगळं चूकीचे सुरु आहे. उद्रेक होण्याअगोदर सावरून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.आंदोलन उग्र झाल्यास त्यास ठाकरे सरकार जबाबदार असेल असा इशारा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी दिला. तर दुसरीकडे धैर्यशील मानेही मैदानात उतरले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या आंदोलनाला बळ मिळताना दिसत आहे.

आश्वासनांची पूर्ती झाली नाही

छत्रपती संभाजी महाराज यांना सरकारने काही आश्वासनं दिली होती, मात्र त्याला अनेक महिने लोटले तरी ती पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे समाजात नाराजीचा संतापजनक सूर आहे. ठाकरे सरकार यांची भूमिका चुकीची असून छत्रपती संभाजी महाराज यांची एकही मागणी पूर्ण झाली नाही. आम्ही सर्व समाज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पाठीशीआहोत. त्यामुळे उद्या आम्ही आंदोलन करणार आहोत. असे पाटील यांनी सांगितले आहे. आमदार पाटील यांनी तुळजापूर येथे याबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी विनोद गंगणे, अविनाश गंगणे, संतोष बोबडे, सचिन पाटील, आनंद कंदले, गुलचंद व्यवहारे हे उपस्थित होते.

धैर्यशील मानेही मैदानात उतरले

राज्य सरकारकडं काही मागण्या अडल्या आहेत. राजेंनी कोल्हापूरमध्ये मूक आंदोलन केलं. राज्यात ते गेले. ते केंद्रात मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत असतात. माझा राजा इथे उपाशी बसतो आणि मी घरात बसेन असं होऊ शकणार नाही, त्यामुळं मी इथं आलो. संभाजी छत्रपती यांचं कुटुंब उपाशी आहे. शौर्याची परंपरा देशाला घालून देणारे घराणे आहे. आपल्या आशीर्वादनं मी खासदार झालोय. मी निश्चितपणे आपली ही भूमिका मंत्रिमंडळासमोर घेऊन जाईन, असं खासदार धैर्यशील माने म्हणाले. राजेंच्या कुटुंब आमरण उपोषणाला बसतं हा माझ्या आयुष्यातला काळा दिवस आहे, असं धैर्यशील माने म्हणाले. ज्यांनी महाराष्ट्राला, देशाला, लाखो शेतकऱ्यांना घडवण्याचा इतिहास केला. त्या शिवछत्रपतींच्या कुटुंबाला उपोषणाला बसावं लागतं हे भूषणावह नाही, असं धैर्यशील माने म्हणाले.

माझा राजा उपाशी असताना मी घरात कसा बसू, छत्रपतींचा मावळा म्हणून इथं आलो : धैर्यशील माने

महावितरण अधिकाऱ्यांच्या टेबलावर साप सोडणं महागात, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

मीडियात राहण्यासाठी काहींची केविलवाणी धडपड, वरुण सरदेसाई केडीएमसीच्या रणमैदानात, थेट रवींद्र चव्हाणांवरच हल्लाबोल

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.