AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : संजू सॅमसनला आता मिळणार सर्वात मोठं गिफ्ट, कधीच विसरणार नाही, सगळ्या जगासमोर पत्नीसाठी बोलला ती गोष्ट

T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसने यावेळी जोरदार कामगिरी केली आहे. त्याला मॅन ऑफ द सिरीजने गौरवण्यात आलं, दरम्यान त्यानंतर तो चांगलाच भावुक झाल्याचं पहायला मिळालं.

T20 World Cup : संजू सॅमसनला आता मिळणार सर्वात मोठं गिफ्ट, कधीच विसरणार नाही, सगळ्या जगासमोर पत्नीसाठी बोलला ती गोष्ट
Sanju SamsonImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 09, 2026 | 8:15 PM
Share

टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रविवारी भारतानं न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला. या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये संजू सॅमसनने जबरदस्त कामगिरी केली. त्याला या कामगिरीबद्दल मॅन ऑफ द सिरीजने गौरवण्यात आलं. संजू सॅमसनने टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळताना भारताच्या वतीने सर्वाधिक 321 धावा केल्या. संजू सॅमसनला मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार मिळताच त्याने आपली पत्नी चारूलतासाठी एक खास संदेश लिहिला आहे. संजू सॅमसने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये आपल्या प्रत्येक पावलावर साथ देण्यासाठी त्याने पत्नी चारूलताचे आभार मानले आहेत. यासोबतच संजू सॅमसनला तो त्याच्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही असं एक गिफ्ट देखील मिळणार आहे.

संजूने आपल्या पत्नीसाठी केली खास पोस्ट

संजू सॅमसने आपला आणि आपल्या पत्नीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की, ज्या दिवशी मी तुला भेटलो त्या दिवसापासून ते आजपर्यंत माझ्यासोबत राहण्यासाठी, मला आहे त्या माझ्या खऱ्या रुपात स्विकारण्यासाठी आणि माझ्यावर नितांत प्रेम करण्यासाठी मी तुझा खूप आभारी आहे. बाहेरच्या जगासाठी मी कसाही असेल, परंतु तु माझा चांगला आणि वाईट काळ दोन्हीही पाहिले आहेस, मात्र तरी देखील तू माझ्यासोबत खंबीरपणे उभी आहेस. माझ्या आयुष्यात क्रिकेटचं किती महत्त्व आहे, हे समजून घेण्यासाठी आणि क्रिकेटला देखील तेवढंच महत्त्व देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या आयुष्यातील या क्षणाची मी जेवढ्या तीव्र अतुरतेने वाट पहात होतो, तेवढ्या अतुरतेने तू देखील वाट पहात होतीस, माझ्या प्रिय पत्नी तुझे खूप खूप आभार असं संजू सॅमसनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान भारताने वर्ल्ड कप जिंकताच संजू सॅमसन चांगलाच भावुक झाल्याचं पहायला मिळालं होतं. या विजयाच्या वेळी त्याची पत्नी चारूलता देखील त्याच्यासोबत उभी होती. दरम्यान संजू सॅमसनच्या या यशानंतर त्याला आता असं एक गिफ्ट मिळणार आहे, जे गिफ्ट तो आपल्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. एका रिपोर्टनुसार संजू सॅमसन केरळमध्ये दाखल होताच त्याचा राज्य सरकारतर्फे भव्य असा सत्कार करण्यात येणार आहे. याबाबत केरळचे मंत्री सिवानकुट्टी यांनी माहिती दिली आहे. मात्र संजू सॅमसनचा सत्कार कधी आणि कोणत्या दिवशी होणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम