IND vs NZ: सुरुवातीचे तीन सामने जिंकूनही शेवट गोड करता आला नाही! सेफर्टचा तडाखा, भारतीय गोलंदाज हतबल; पाचव्या टी-20 मध्ये न्यूझीलंडचा विजय
India vs New Zealand T20 Series: न्यूझीलंडविरुद्ध भारताने पहिले तीन सामने जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली होती. न्यूझीलंडने मालिकेतील शेवटचे दोन सामने जिंकले. पण भारताने मालिका 3-2 ने जिंकली आहे.

न्युझीलंडविरुद्धच्या मालिकेतील अंतिम टी-20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला 7 गडी राखून पराभव पत्करावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 गडी गमावून 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडने केवळ 3 गडी गमावून 18 व्या षटकात सहजपणे लक्ष्याचा पाठलाग केला. मात्र भारताने ही मालिका 3-2 ने जिंकली. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 191 धावा केल्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही.
अभिषेक शर्मा फलंदाजीत काही विशेष कामगिरी करू शकला नाही आणि केवळ 1 धाव काढून बाद झाला. संजू सॅमसन 10 चेंडूंचा सामना करून 4 धावा करून बाद झाला. 19 धावांवर 2 गडी गमावून अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला इशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी सावरले. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या 43 चेंडूंमध्ये 93 धावांची भागीदारी केली. ईशान किशन उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत होता त्याने अवघ्या 28 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.
ईशानने 32 चेंडूंचा सामना करत 61 धावांची दमदार खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान त्याने पाच चौकार आणि पाच षटकार मारले. अय्यरने 22 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. 23 चेंडूंमध्ये 50 धावा करून तो बाद झाला. तिलक वर्मा चांगली कामगिरी करू शकला नाही आणि केवळ सहा धावा करू शकला. नमन धीर आणि नितीश कुमार रेड्डी यांनी शेवटच्या षटकांमध्ये शानदार फलंदाजी केली.
दोघांनी मिळून 30 चेंडूंमध्ये 46 धावांची भागीदारी केली. 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 23 चेंडूंमध्ये 33 धावा करून नमन बाद झाला. नितीश कुमार रेड्डीने 17 चेंडूंमध्ये 22 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने 6 धावा केल्या. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्नेने आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 19 धावा देत 4 बळी घेतले. ब्लेअर टिकनर आणि नॅथन स्मिथ यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्सनेही रविवारी भारताविरुद्धच्या पाचव्या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने 65 धावांची वेगवान खेळी केली. या खेळीदरम्यान फिलिप्सने द्विपक्षीय टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केला आहे. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज ग्लेन फिलिप्स द्विपक्षीय टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
