मीडियात राहण्यासाठी काहींची केविलवाणी धडपड, वरुण सरदेसाई केडीएमसीच्या रणमैदानात, थेट रवींद्र चव्हाणांवरच हल्लाबोल

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जुंपलेली असतानाच आता या वादात युवा सेना नेते वरुण सरदेसाई यांनी उडी घेतली आहे. हिंदूत्वाचा धागा पकडून आम्ही एकत्र राहिलो.

मीडियात राहण्यासाठी काहींची केविलवाणी धडपड, वरुण सरदेसाई केडीएमसीच्या रणमैदानात, थेट रवींद्र चव्हाणांवरच हल्लाबोल
मीडियात राहण्यासाठी काहींची केविलवाणी धडपड, वरुण सरदेसाई केडीएमसीच्या रणमैदानात, थेट रवींद्र चव्हाणांवरच हल्लाबोलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 2:53 PM

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (kdmc) निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (shivsena) आणि भाजपच्या (bjp) नेत्यांमध्ये जुंपलेली असतानाच आता या वादात युवा सेना नेते वरुण सरदेसाई यांनी उडी घेतली आहे. हिंदूत्वाचा धागा पकडून आम्ही एकत्र राहिलो. देशद्रोहाचा आरोप असलेल्या नवाब मलिकांच्या संदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची काय भूमिका आहे? असा सवाल भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित केला होता. चव्हाण यांच्या या आरोपाला वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्याही प्रकाशझोतात राहता आलं पाहिजे. आपल्यालाही मीडियात प्रसिद्धी मिळाली पाहिजे. त्यामुळे शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर टीका करण्याची काही लोकांची प्रवृत्ती झाली आहे. मीडियात चमकण्यासाठीची ही काही लोकांची धडपड सुरू आहे, अशी खोचक टीका वरुण सरदेसाई यांनी चव्हाण यांच्यावर नाव न घेता केली.

शिवसेना युवा सेना सहसचिव योगेश निमसे यांनी कल्याण पश्चिमेवरील मॅक्सी ग्राऊंडवर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी युवा सेना नेते वरुण सरदेसाई, पदाधिकारी दीपेश म्हात्रे, माजी महापौर रमेश जाधव, अभिषेक मोरे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना वरुण सरदेसाई यांनी थेट रवींद्र चव्हाणांवर निशाणा साधला.

युवा सैनिकांना निवडणुकीत संधी मिळेल

योगेश निमसे यांनी आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. श्रीकांत शिंदे याची फुटबॉल असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे. युवा सेनेत चांगले काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीत चांगली संधी मिळेल, असा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त केला. मात्र काही दिवसापासून सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य करणारे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर वरुण सरदेसाई यांनी सरदेसाई यांनी सडेतोड टीका केली आहे. 2019मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले. शिंदेसाहेब पालकमंत्री झाल्यावर त्यांनी जी विकास कामे केले. त्याचा रिझल्ट आज पाहू शकता. अनेक पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते आमच्या पक्षात येत आहेत. मात्र, काही लोक बातम्या छापून येण्यासाठी आमच्यावर टीका करत आहेत. हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा टोला त्यांनी लगावला.

चव्हाण नेमकं काय म्हणाले?

महायुतीत हिंदूत्वाचा धागा पकडून आम्ही एकत्रित राहिलो. आता बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत व्यवहार केल्याप्रकरणी मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली आहे. देशद्रोहाचा आरोप असलेल्या मलिकांविषयी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची काय भूमिका आहे? हे त्यांनी सांगावे, असे आव्हान आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिले होते.

संबंधित बातम्या:

पळवून आणलेल्या मुलीसाठी भांडले, एकाने दुसऱ्याला यमसदनी धाडले; कल्याणमधील धक्कादायक घटना

युक्रेनमधील भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक घोषित; एका फोनवर मिळेल मदत, जाणून घ्या सर्व नंबर!

भाजपच्या ‘गाजर दाखवलं’ला शिवसेनेचं ‘करून दाखवलं’ने प्रत्युत्तर; कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीपूर्वीच ‘बॅनर युद्ध’

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.