गर्दीचा फायदा घेऊन काही चोर आपला आपला मोबाईल लंपास (Mobile Thief) करतात. अशाच एका चोराला पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. याा चोराकडे तर जणू चोरलेल्या मोबाईलचा साठाच सापडला आहे.
उद्या शाळेचा शेवटचा दिवस होता. आज वर्गात सर्व मुले बसली होती. याच दरम्यान शाळेतील शिक्षकांनी मुलाला एका रुममध्ये एकटेच बसायला सांगितले. तुझ्या पालकांनी दोन वर्षाची फी भरलेली नाही. तुला इथेच बसावे लागेल, असे सांगितले. जवळपास तीन तास मुलगा वर्गात एकटाच बसला होता.
Kalyan BJP MNS Protest : कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रचंड बिकट झाला आहे. या गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आज अखेर भाजप आणि मनसेने तहान मोर्चाचं आयोजन केलं होतं.
कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील एका उच्चभ्रु सोसायटीत ही दुर्दैवी घटना घडली. माधव संकल्प कॉम्प्लेक्स असे या सोसायटीचे नाव आहे. या सोसायटीतील क्लब हाऊसमधील स्विमिंग पूलमध्ये 16 वर्षांचा आयुष पोहण्यास गेला होता. रविवारच्या सुट्टीमुळे तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याच्या नाकातों
कल्याणमध्ये नारळाच्या झावळ्यांपासून तयार केलेल्या केरसुण्या, टोपल्या सुपड्या विकून ही महिला आपला उदारनिर्वाह करते. या महिलेला दुकानासमोर ब्रेसलेट सापडलं. हे ब्रेसलेट सोन्याचं होतं त्याची किंमत दोन लाख रुपये होते. हे ब्रेसलेट स्वतः जवळ ठेवण्याचा मोह तिला झाला नाही कारण तिच्यातला प्रामाणिकपणा जागृत होता. हरवलेले ब्रेसले�
Nandgaonkar on Raut: अल्टिमेटम फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच (balasaheb thackeray) देऊ शकतात. तेच अल्टिमेटम देत होते. इतर कुणी राज्य सरकारला अल्टिमेटम देऊ शकत नाही या शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या विधानावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पोलिस त्याचा आठ महिन्यांपासून कसून शोध घेत होते. अखेर आज तो राहत्या घरी आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी त्याच्या घरी दाखल होत मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. पापा हड्डीच्या अटकेचा थरार तब्बल तासभर चालला. मात्र पोलिसांनी त्याचे सगळे मनसुबे उधळून लावत त्याला अखेर पकडले.
हे स्मारक प्रेरणादायी आणि स्फूर्ती ठरेल असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला मंगळवारी नगरविकास मंत्री शिंदे यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले.
या मेळाव्यामध्ये विविध बँकांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी प्रकाश पाटील यांनी ठाणे ग्रामीण परिसरात 100 इलेक्ट्रिक वाहन महिलांसाठी उपलब्ध करून देणार असून 25 महिलांना मिळूनही एक गाडी देण्यात येणार असल्याचं सांगितलं. तर यावेळी दीपाली सय्यद यांनी हा कार्यक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.