AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’च्या यशाने का खुश नाही आमिर खान? ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ला जाणवली याची कमतरता

चीनच्या तुलनेत आपल्या देशात दहा पटींनी थिएटर स्क्रीन्स कमी असल्याचं आमिर खान म्हणाला. यावेळी त्याने आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाचं उदाहरण दिलं. तो म्हणाला, "हा चित्रपट जर 15000 थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असता तर.."

'धुरंधर'च्या यशाने का खुश नाही आमिर खान? 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ला जाणवली याची कमतरता
धुरंधरबद्दल काय म्हणाला आमिर खान?Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 08, 2026 | 3:54 PM
Share

रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. ओटीटीवर स्ट्रीम होऊनही या चित्रपटाची कमाई जगभरात 1300 कोटींच्या पार गेली आहे. पण जर का हा चित्रपट 15000 थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असता तर याहून कित्येक पटींनी अधिक कमाई झाली असली, असं मत अभिनेता आमिर खानने नोंदवलं आहे. चीनला मात देण्यासाठी भारतात आणखी थिएटर्सची गरज असून भारतातील काही भागांमध्ये सिंगल स्क्रीनसुद्धा उपलब्ध नसल्याची खंत आमिरने यावेळी व्यक्त केली. एखादा चित्रपट फार न चालण्यामागे या गोष्टी जबाबदार असल्याचं त्याने म्हटलंय.

‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आमिरने सांगितलं की भारतात आणखी थिएटर्सची खूप गरज आहे. सध्यस्थितीला देशात फक्त 9000 स्क्रीन्स आहेत. तर चीनमध्ये याची संख्या लाखोंमध्ये आहे. “त्यांच्या तुलनेत आपल्या देशात 10 पटींनी कमी स्क्रीन्स आहेत. म्हणूनच जेव्हा एखादा मोठा चित्रपट जेव्हा चीनमध्ये प्रदर्शित केला जातो, तेव्हा तिथे जवळपास दोन अब्ज डॉलर्सची कमाई होते. असं फक्त तिथेच घडतं. दुसऱ्या कुठल्याच देशात नाही. फक्त चीनमध्येच चित्रपट अधिक कमाई करतात. तिथे प्रदर्शित झालेला चित्रपट अब्जावधी डॉलर्सची कमाई करतो. मी युएस डॉलर्सबद्दल बोलतोय. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या स्क्रीन्सची संख्या वाढवू, तेव्हा तुम्हाला फरक दिसून येईल”, असं आमिर म्हणाला.

यावेळी आमिरने ‘धुरंधर’ या चित्रपटाचं उदाहरण दिलं. तो पुढे म्हणाला, “चला धुरंधरचं उदाहरण पाहुयात. या चित्रपटाने 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तुम्हीच विचार करा, जर हा चित्रपट 5000 स्क्रीन्सऐवजी 15000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला असला, तर काय झालं असतं? कमाईचा आकडा आणखी जास्त असता. मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय की खरा बदल तेव्हाच घडून येईल, जेव्हा स्क्रीन्सची संख्या वाढेल. कारण आपल्या देशात असे बरेच जिल्हे आहेत, जिथे सिंगल स्क्रीनसुद्धा नाही.”

गेल्या दहा वर्षांत चीनमध्ये प्रदर्शित झालेल्या भारतीय चित्रपटांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

चित्रपट चीनमधील कमाई जगभरातील कमाई चीनमधील प्रदर्शनाची तारीख
दंगल 1305.29 कोटी रुपये 20270.30 कोटी रुपये  5 मे 2017
सिक्रेट सुपरस्टार 757.10 कोटी रुपये 912.75 कोटी रुपये 19 जानेवारी 2018
अंधाधुन 333.62 कोटी रुपये 442.72 कोटी रुपये 3 एप्रिल 2019
बजरंगी भाईजान 295.76 कोटी रुपये 921.93 कोटी रुपये 2 मार्च 2018
हिंदी मिडियम 219.17 कोटी रुपये 334.06 कोटी रुपये 7 एप्रिल 2018
हिचकी 156.66 कोटी रुपये 236.48 कोटी रुपये 12 ऑक्टोबर 2018
पीके 128.58 कोटी रुपये 792 कोटी रुपये 22 मे 2015
मॉम 110.04 कोटी रुपये 175.05 कोटी रुपये 10 मे 2019
टॉयलेट- एक प्रेम कथा 100.39 कोटी रुपये 316.97 कोटी रुपये 8 जून 2018
महाराजा 91.65 कोटी रुपये 199.20 कोटी रुपये 29 नोव्हेंबर 2024

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे भारतात चार कोटी तिकिटं विकली गेली आहेत.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय