AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: गौतम गंभीरने द्रविड आणि लक्ष्मणला ट्रॉफी केली समर्पित, त्याचं कारण असं की…

भारताने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद जिंकलं. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताला यश मिळालं आहे. असं असलं तरी जेतेपदानंतर गौतम गंभीरने ही ट्रॉफी राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणला समर्पित केली आहे. त्याचं कारणंही तसंच आहे.

T20 World Cup: गौतम गंभीरने द्रविड आणि लक्ष्मणला ट्रॉफी केली समर्पित, त्याचं कारण असं की...
T20 World Cup: गौतम गंभीरने द्रविड आणि लक्ष्मणला ट्रॉफी केली समर्पित, त्याचं कारण असं की...Image Credit source: PTI
| Updated on: Mar 09, 2026 | 8:28 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यापूर्वी निकाल काय लागेल? याबाबत धाकधूक होती. पण भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. जेतेपदासह भारताने काही ऐतिहासिक नोंदी केल्या आहेत. सलग दोन जेतेपद मिळवणारा, तिसऱ्यांदा ट्रॉफी मिळवणारा, यजमानपद असताना जेतेपद मिळवणारा भारता हा पहिला संघ ठरला आहे. इतकंच काय तर प्रशिक्षक गौतम गंभीरच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवला गेला आहे. दोन आयसीसी जेतेपद जिंकणारा पहिला भारतीय प्रशिक्षक ठरला आहे. असं असताना प्रशिक्षक गौतम गंभीर याने टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपद माजी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना समर्पित केलं आहे. जेतेपद मिळाल्यानंतर गौतम गंभीर म्हणाला की, हे यश राहुल भाई आणि लक्ष्मण भाईला समर्पित करू इच्छितो.

गौतम गंभीरने जेतेपद राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना समर्पित केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. जेतेपदानंतर गौतम गंभीरच्या या वक्तव्याने अनेकांची मनं जिंकली. पण असं सांगण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. त्याचं कारण असं की, गौतम गंभीरने त्यांच्या कामाला सलाम केला आहे. त्यामुळे त्याच्या प्रशिक्षणाखाली संघाला चॅम्पियन होणं सोपं झालं. गौतम गंभीरच्या मते, राहुल द्रविडने वनडे वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियात आत्मविश्वास फुंकला. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम खेळाडूंमध्ये दिसून आला. त्यामुळेच आज टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे.

दुसरीकडे, सेंटर ऑफ एक्सीलेंस म्हणजेच सीओई ही भारतीय क्रिकेट कणा आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. व्हीव्हीएस लक्ष्मणच्या देखरेखीत खेळाडूंची फिटनेस आणि प्रशिक्षणाची काळजी घेतली जाते. त्यामुळे गौतम गंभीरने या दोघांना जेतेपद समर्पित केलं. गौतम गंभीरच्या मते या दोघांनी पडद्यामागून टीम इंडिया घडवण्याचा मोलाचं सहकार्य केलं आहे. यासाठीच गौतम गंभीर त्यांना श्रेय देण्यास विसरला नाही. टीम इंडियाने गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आणि टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकली आहे.

Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली