AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एवढा मोठा उद्योगपती अन् इतक्या साध्या कॅफेत जेवण… मुकेश अंबानींची आवडती डिश कोणती?

Mukesh Ambani : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून उद्योगपती मुकेश अंबानी यांची ओळख आहे. आता त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, यात ते आपल्या कुटुंबासह एका कॅफेमध्ये जेवणासाठी आल्याचे दिसत आहे.

एवढा मोठा उद्योगपती अन् इतक्या साध्या कॅफेत जेवण... मुकेश अंबानींची आवडती डिश कोणती?
Mukesh AmbaniImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 09, 2026 | 7:58 PM
Share

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून उद्योगपती मुकेश अंबानी यांची ओळख आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब अनेकदा एकत्र आलेले तुम्ही पाहिले असेल. एखादा मोठा कार्यक्रम असो किंवा जवळच्या व्यक्तीचे लग्न असेल तेव्हा अंबानी कुटुंबातील सदस्य नेहमीच एकत्र दिसतात. अशातच आता मुकेश अंबानी आपला धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि सून राधिका मर्चंट यांच्यासोबत अचानक मुंबईतील एका साऊथ इंडियन कॅफेमध्ये दिसले. हा त्याचा आवडता कॅफे असल्याचीही माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उद्योगपती मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासह मुंबईतील एका कॅफेमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. त्यांना पाहताच लोकांची गर्दी जमली. कॅफेमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले, जे आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यात सामान्य लोकांप्रमाणे अंबानी कुटुंब या कॅफेमध्ये जात असताना दिसत आहे. त्यांचा हा साधेपणा अनेकांना भावला आहे.

अंबानी कुटुंब कोणत्या कॅफेमध्ये गेले होते?

समोर आलेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी हे अनंत आणि राधिकासोबत मुंबईतील चर्चगेट परिसरातील रामेश्वरम कॅफेमध्ये गेले होते. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर लोकांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या. अनेक नेटकऱ्यांनी म्हटले की, ‘इतक्या मोठ्या उद्योगपतीने साधेपणाने कॅफेमध्ये जाऊन जेवण करणे त्यांना आणखी खास बनवते.’

साऊथ इंडियन खाद्यपदार्थांची आवड

मुकेश अंबानी यांची खाद्यपदार्थांची आवड खूप साधी असल्याचे समोर आले आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले आहे की त्यांना साऊथ इंडियन आणि गुजराती जेवण आवडते. त्यांच्या आवडत्या पदार्थांमध्ये इडली सांबर पहिल्या क्रमांकावर आहे. प्रत्येक रविवारी इडली-सांबार खाणे त्यांना आवडते. याशिवाय त्यांना गुजराती डिश पंकी देखील खूप आवडते. हा पदार्थ तांदळाच्या पिठापासून बनवला जातो आणि केळ्याच्या पानात वाफवून तयार केला जातो.

View this post on Instagram

A post shared by Rajas Jain (@rjrajas)

मुंबईतील हा आवडता कॅफे

मुकेश अंबानी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की ते मुंबईतील प्रसिद्ध साऊथ इंडियन आणि गुजराती रेस्टॉरंटमधील जेवण पसंत करतात. शहरातील म्हैसूर कॅफे आणि स्वाती ही त्यांची आवडती ठिकाणे आहेत. या ठिकाणी मिळणारे पारंपरिक आणि हलके जेवण त्यांना खूप आवडते. त्यामुळे ते व्यस्त व्यवसायिक आयुष्यातून वेळ काढून ते अशा ठिकाणी जाऊन जेवणाचा आनंद घेतात.

अंबानी कुटुंब साध्या पोशाखात दिसले

मुकेश अंबानी यांनी काळ्या रंगाची पँट आणि बेज रंगाचा स्वेटशर्ट घातला होता. अनंत अंबानी यांनी नेव्ही ब्लू रंगाचा शर्ट, काळी पँट आणि शूज घातले होते. तर राधिका मर्चंट यांनी पांढऱ्या रंगाचा स्ट्रॅपी फ्रॉक परिधान केली होता आणि त्यासोबत गुलाबी रंगाचा स्टोल घेतला होता. त्यांच्या या पोशाखाचेही नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप