AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; अनेक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर

इराण युद्धाचे पडसाद देशात जाणवू लागले आहेत. व्यावसायिक गॅसच्या वापरावर मर्यादा आल्याने संभाजीनगरात उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; अनेक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर
Commercial cylinder shortage
| Updated on: Mar 09, 2026 | 7:52 PM
Share

इराणवर इस्राईल-US यांनी युद्ध लादल्याने इंधन आणि व्यापार ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे. इराणने अनेक अरब देशातील रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांना टार्गेट केल्याने आणि होर्मुज स्ट्रेट हा समुद्र मार्गावर अडचणी उभ्या केल्याने इंधनाचे मोठे संकट जगावर निर्माण झाले आहे. यामुळे भारतातही गॅस पुरवठा बाधित झाला आहे. त्यामुळे घरगुती गॅसचे दर वाढले आहेत. तर व्यावसायिक गॅस वापरावर मर्यादा आली आहे. आता राज्यातील या गॅस टंचाईचा सामना उद्योगधंद्यांना करावा लागत आहे. संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

छत्रपती संभाजीनगरात झळ

गॅस टंचाईचा मोठा फटका उद्योगांना बसत आहे, संभाजीनगरातील ५ मोठे उद्योग बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक क्षेत्राला गॅस टंचाईची झळ बसली आहे.व्यावसायिक वापराच्या गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने अनेक उद्योग अडचणीत सापडले असून तब्बल पाच मोठे उद्योग बंद करण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे.ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपन्या आणि स्टील उद्योगांवर याचा सर्वाधिक परिणाम होत आहे. उद्योगांना आवश्यक असलेला गॅस न मिळाल्याने उत्पादन प्रक्रिया ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जर अशीच गॅस टंचाई कायम राहिली तर त्यामुळे उद्या आणखी काही उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.संभाजीनगर औद्योगिक क्षेत्राला दररोज सुमारे २५० ते ३०० मेट्रिक टन गॅसची गरज असते.मात्र सध्या गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने उद्योगांमध्ये मोठे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, सीएमआयए (Chamber of Marathwada Industries and Agriculture) या उद्योग संघटनेने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत मुख्यमंत्री यांना पत्र पाठवले आहे. तातडीने गॅस पुरवठा सुरू करून उद्योगांना मदत करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

जळगावात काय स्थिती

अमेरिका इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जळगाव जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरवर आधारित छोटे छोटे उद्योग संकटात सापडलेले असून व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद झाला तर उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. जळगावच्या एमआयडीसीतील चिक्की आणि गुळाचे लाडू बनवणाऱ्या कंपनीमध्ये दररोज 15 ते 20 व्यावसायिक सिलींडर लागतात. सध्या तरी व्यावसायिक सिलेंडरचा कंपनीकडून पुरवठा केला जात असल्याने समस्या नाही. मात्र, पुढच्या काळात व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा  झाला तर उद्योग पूर्णपणे ठप्प होण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे. उद्योग जर बंद पडले तर परिणामी कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार देखील बेरोजगार होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना