MHT CET 2020 | उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुढे ढकलल्या, उदय सामंत यांचा निर्णय

| Updated on: Jun 22, 2020 | 3:42 PM

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील, असेही सामंत यांनी सांगितले. (MHT CET 2020 Exams Postpone for uncertain period says Minister Uday Samant)

MHT CET 2020 | उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी पुढे ढकलल्या, उदय सामंत यांचा निर्णय
Follow us on

मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. (MHT CET 2020 Exams Postpone for uncertain period says Minister Uday Samant)

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोविड19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : अंतिम वर्षाची परीक्षा न घेता पदवी, इंजिनिअरिंग, फार्मसीच्याही परीक्षा नाहीत, ATKT चा निर्णय बाकी : उदय सामंत

विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील, असेही सामंत यांनी सांगितले.

दोनच दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी “अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी देता येईल. ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी लिहून द्यावे, त्यांची परीक्षा घेतली जाईल. कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा घेता येतील”, असं सांगितलं होतं.

अव्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा घेतली जाणार नाही. विद्यार्थ्यांना हवी असल्यास ऐच्छिक परीक्षा घेतली जाईल, असं त्यांनी नमूद केलं होतं.

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता व्यावसायिक अभ्यासक्रम, इंजिनिरिंग, फार्मसी आदी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाहीत. यासाठी राज्य सरकार, राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समितीने निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं. (MHT CET 2020 Exams Postpone for uncertain period says Minister Uday Samant)