ऑक्सिजन तयार करणाऱ्या कारखान्यांमधून आता फक्त माणसांसाठीच पुरवठा, तरीही ऑक्सिजनची कमतरता : जयंत पाटील

| Updated on: Sep 02, 2020 | 7:40 PM

"सध्या फक्त माणसांसाठीच ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे", अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी दिली.

ऑक्सिजन तयार करणाऱ्या कारखान्यांमधून आता फक्त माणसांसाठीच पुरवठा, तरीही ऑक्सिजनची कमतरता : जयंत पाटील
Follow us on

सांगली : “राज्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. ऑक्सिजन तयार करणाऱ्या कारखान्यांमधून ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे. ऑक्सिजन तयार करणाऱ्या कारखान्यात सर्व क्षमतेने ऑक्सिजन निर्माण केले जात आहे. त्यांनी औद्योगिक कामांसाठी ऑक्सिजन देणे बंद केले आहे. आता फक्त माणसांसाठीच ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे”, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी दिली.

जयंत पाटील यांच्याहस्ते सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे अत्याधुनिक कोव्हिड हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी जयतं पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “खासदार संजय काका पाटील यांच्या पुढाकाराने, संपूर्ण लोक सहभागातून 63 ऑक्सिजन बेड्सचे अत्याधुनिक कोव्हिड हॉस्पिटल उभे करण्यात आले आहे”, असे जयंत पाटील (Minister Jayant Patil) म्हणाले.

“ऑक्सिजनचे संभाव्य संकट लक्षात घेता लोकानींही स्वतःची काळजी घ्यावी. डॉकटरांच्या सल्ल्याऐवजी ऑक्सिजनचा हट्ट धरुन चालणार नाही. सांगली जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन मुंबईमधून आरोग्य सेवा देणारे मनुष्यबळ मागवत आहोत. तसेच 40 व्हेंटिलेटर आले असून आणखी 40 व्हेंटिलेटर येणार आहेत”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

“अवघ्या 72 तासात अत्याधुनिक कोरोना हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. यामध्ये 63 ऑक्सिजन बेड्स आहेत. त्यात आयसीयूचीदेखील सुविधा आहे. 26 हायप्लॉनेझन मशीन, घेतल्या आहेत. 5 सीपीएप्बाय पीएप मशीन आणि फॉरटेबल एक्सरे मशीन 1 विथ कॅसेट इथे आहेत”, अशी माहिती खासदार संजय काका पाटील यांनी दिली.

हेही वाचा :

अ‍ॅम्ब्युलन्स नाही, बेड नाही, पांडुरंगचा अखेरपर्यंत संघर्ष, आरोग्य यंत्रणेच्या चिंधड्या उडवणारा घटनाक्रम

दादाला भूक लागली होती, त्याला डबाही पोहोचला नाही, पांडुरंग रायकरांच्या बहिणीचा प्रशासनावर संताप

चाळीशीतील उमद्या पत्रकाराचा मृत्यू अंतर्मुख करायला लावणारा, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : देवेंद्र फडणवीस

बूम सॅनिटाईज, घाईघाईत कोव्हिड सेंटरचं उद्घाटन, पांडुरंगबाबतच्या प्रश्नावर अजित पवार गप्प