AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाळीशीतील उमद्या पत्रकाराचा मृत्यू अंतर्मुख करायला लावणारा, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : देवेंद्र फडणवीस

एका पत्रकराचा अशाप्रकारे मृत्यू ही दुर्दैवी आणि मनाला धक्का लावून जाणारी बाब आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

चाळीशीतील उमद्या पत्रकाराचा मृत्यू अंतर्मुख करायला लावणारा, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : देवेंद्र फडणवीस
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 02, 2020 | 12:47 PM
Share

नागपूर : टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन झालं. एका पत्रकराचा अशाप्रकारे मृत्यू ही दुर्दैवी आणि मनाला धक्का लावून जाणारी बाब आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पांडुरंग या चाळीशीतील उमद्या पत्रकाराचा असा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे, अंतर्मुख करायला लावणारा आहे, पत्रकाराची परिस्थिती अशी असेल ती योग्य नाही, याबाबत मी प्रशासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis reaction on Pandurang Raykar death)

नागपुरात सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोना पसरतो आहे. त्याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. मृत्यूदर चिंता वाढविणारा आहे. मी पश्चिम महाराष्ट्राचा कोरोनासंदर्भात दौरा केला. टेस्टिंग वाढविण्याची गरज आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रदेखील लिहिलं, असं फडणवीस यांनी सांगितलं.

पूर्व विदर्भात पूर परिस्थितीने मोठं नुकसान झालं आहे त्याचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.

उपचाराअभावी पांडुरंग रायकर यांचं निधन

कोरोना काळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.

पांडुरंग रायकर यांची कारकीर्द

पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने पांडुरंग रायकर यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. लॉकडाऊन ते अनलॉकिंग आणि मिशन बिगिन अगेनपर्यंत सर्व महत्त्वाच्या घडामोडी पांडुरंग यांनी ‘टीव्ही 9’ च्या माध्यमातून मराठी माणसापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या निधनाने टीव्ही 9 परिवाराला धक्का बसला आहे. मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. (TV9 Marathi Pune Reporter Pandurang Raykar Dies of COVID due to lack of Ambulance)

ई टीव्ही मराठी, एबीपी माझा ते टीव्ही 9 मराठी असा पांडुरंग यांचा पत्रकारितेतील 15 वर्षांचा प्रवास. शेती ते सिनेमा, क्रीडा ते राजकारण अशा विविध विषयांवर पांडुरंग यांनी वार्तांकन केलं. गेल्या तीन वर्षापासून ते टीव्ही 9 मराठीसोबत होते.

(Devendra Fadnavis reaction on Pandurang Raykar death)

संबंधित बातम्या 

अ‍ॅम्ब्युलन्स नाही, बेड नाही, पांडुरंगचा अखेरपर्यंत संघर्ष, आरोग्य यंत्रणेच्या चिंधड्या उडवणारा घटनाक्रम  

संयत रिपोर्टर, शांत स्वभाव, ‘टीव्ही 9’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन 

Follow Us
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......