AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: भारत-श्रीलंका कसोटी सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्ट डिटेल्स

भारतीय संघ पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 मालिकेत दक्षिण अफ्रिकेकडून मात खाल्ल्यानंतर श्रीलंकेशी सामना होणार आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.

IND vs SL: भारत-श्रीलंका कसोटी सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्ट डिटेल्स
IND vs SL: भारत-श्रीलंका कसोटी सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्ट डिटेल्सImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 14, 2026 | 5:11 PM
Share

भारतीय क्रीडाप्रेमींची प्रतीक्षा आता काही तासातच संपणार आहे. भारतीय संघ पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. इंग्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यानंतर टीम इंडियाने बऱ्यापैकी आराम केला. आता श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाले आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय कसोटी सामन्यात प्रदीर्घ कालावधीनंतर उतरणार आहे. आयपीएल 2026 स्पर्धेनंतर अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला होता. पण हा काही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेचा भाग नव्हता. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेकडून 0-2 ने मात खाल्ल्यानंतर टीम इंडियाला श्रीलंकेशी दोन हात करण्यास सज्ज आहे. ही मालिका भारताला काहीही करून 2-0 ने जिंकणं भाग आहे. अन्यथा भारताचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगण्याची दाट शक्यता आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका पहिला सामना कधी आणि केव्हा सुरू होईल?

भारत श्रीलंका यांच्यात 15 ऑगस्टपासून पहिला कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. नाणेफेकीचा कौल अर्धा तास आधी म्हणजेच सकाळी 9.30 वाजता होईल.

भारत विरुद्ध श्रीलंका पहिला कसोटी सामना कुठे खेळला जाईल?

भारत श्रीलंका कसोटी मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेतील गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात खेळला जाईल.

भारत श्रीलंका कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

भारत श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका असून सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केली जाईल. या प्रादेशिक भाषांचा पर्याय असणार आहे. ज्यांच्याकडे डीडी फ्री डिश आहे. त्यांना ही मालिका डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.

भारत श्रीलंका ऑनलाइन सामना कुठे पाहता येईल?

भारतीय क्रिकेटप्रेमी प्रवासात असतील त्यांना ऑनलाईन हा सामना पाहता येईल. सोनी लीव्ह एपवर हा सामना पाहता येईल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

भारताचा संभाव्य संघ : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

श्रीलंकेचा संभाव्य संघ : धनंजय डिसिल्वा (कर्णधार), लहिरू उदारा, निशान मधुष्का, कामिंदु मेंडिस, दिनेश चंडिमल, सोनल दिनुषा, निरोशन डिकवेल्ला (विकेटकीपर), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लहिरू कुमारा

Follow Us
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...