नयनतारा यांचं महाराष्ट्रात स्वागत करतो, त्यांनी जरुर यावं : राज ठाकरे

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई : ज्येष्ठ लेखिका नयनतारा यांना 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रण देण्यात आलं. पण ते मनसेच्या विरोधामुळे मागे घ्यावं लागल्याची चर्चा आहे. यावर मनसेकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलंय. नयनतारा सहगल यांनी महाराष्ट्रात जरुर यावं, त्यांचं स्वागत आहे, असं मनसेने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय. या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन यवतमाळमध्ये करण्यात आलंय. मराठी […]

नयनतारा यांचं महाराष्ट्रात स्वागत करतो, त्यांनी जरुर यावं : राज ठाकरे
फोटो सौजन्य - MNS Adhikrut चं ट्विटर हँडल
Follow us on

मुंबई : ज्येष्ठ लेखिका नयनतारा यांना 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रण देण्यात आलं. पण ते मनसेच्या विरोधामुळे मागे घ्यावं लागल्याची चर्चा आहे. यावर मनसेकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलंय. नयनतारा सहगल यांनी महाराष्ट्रात जरुर यावं, त्यांचं स्वागत आहे, असं मनसेने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.

या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन यवतमाळमध्ये करण्यात आलंय. मराठी साहित्यीक सोडून इंग्रजी साहित्यिकांना निमंत्रण दिल्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्याने संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला. पण महाराष्ट्रातल्या मराठी साहित्याचं मराठीपण जपलं जावं ही आपल्या सहकाऱ्याची इच्छा आहे, जी योग्य आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. वाचालेखिका नयनतारा यांना दिलेलं निमंत्रण परत घेतलं!

“नयनतारा सहगल यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका संमेलनात येणार असतील आणि मराठी साहित्याची समृद्ध परंपरा आणखी खुली होणार असेल आणि ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेत त्या एक वाहक होणार असतील तर मला अथवा माझ्या पक्षाचा याला विरोध असण्याचं कारण नाही. ही भूमिका यापूर्वीच मांडण्यात आली असून पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी ती पुन्हा मांडत आहे. नयनतारा सहगल यांनी जरुर यावं, मनसेचा त्यांना विरोध नाही. त्यांचं मनापासून स्वागत करतो,” अशी भूमिका राज ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

दरम्यान, अशा मुद्द्यांवर भूमिका घेण्यापूर्वी मनसैनिकांनी माझ्याशी चर्चा करावी, अशी सक्त ताकीदही राज ठाकरेंनी दिली आहे. मराठी साहित्य संमेलन आपलं आहे. या संमेलनाच्या आयोजकांना माझ्या सहकाऱ्यांच्या भूमिकेमुळे जो त्रास झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय.

काय आहे वाद?

92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी निवेदन प्रसिद्धी माध्यमांना दिलंय. या निवेदनाद्वारे त्यांनी नयनतारा सहगल यांना लेखी निमंत्रण दिलं होतं. सहगल यांच्या भाषा लेखनाबद्दल अनेक लोकांनी आक्षेप घेतले आणि संमेलन उधळून टाकण्याची भाषा वर्तमानपत्रातून केली. त्यामुळे कोणताही अडथळा येऊ नये यासाठी निमंत्रण मागे घेण्यात आलंय.

कोण आहेत नयनतारा सहगल?

देशात दोन वर्षांपूर्वी पुरस्कार वापसीची मालिकाच सुरु झाली होती. सर्वात अगोदर पुरस्कार वापसी करणाऱ्या लेखिका म्हणून नयनतारा यांची ओळख आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या त्या भाची आहेत. नेहरु-गांधी कुटुंबातील सदस्य म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. पुरस्कार वापसीची कोणतीही तरतूद नसल्याने नयनतारा यांच्यासह 10 साहित्यिकांनी पुरस्कार पुन्हा स्वीकारले होते.