लेखिका नयनतारा यांना दिलेलं निमंत्रण परत घेतलं!

नवी दिल्ली : देशपातळीवर महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल, अशी घटना घडली आहे. यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 92 व्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन लेखिका नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीत होणार होतं. पण कार्यक्रमाला येऊ नका, असं पत्र नयनतारा यांना आयोजकांकडून पाठवण्यात आलंय. काही अपरिहार्य कारणांमुळे आश्वासन पूर्ण करु शकत नसल्याचं पत्रात म्हटलंय. 92 व्या अखिल भारतीय …

लेखिका नयनतारा यांना दिलेलं निमंत्रण परत घेतलं!

नवी दिल्ली : देशपातळीवर महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल, अशी घटना घडली आहे. यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 92 व्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन लेखिका नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीत होणार होतं. पण कार्यक्रमाला येऊ नका, असं पत्र नयनतारा यांना आयोजकांकडून पाठवण्यात आलंय. काही अपरिहार्य कारणांमुळे आश्वासन पूर्ण करु शकत नसल्याचं पत्रात म्हटलंय.

92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी निवेदन प्रसिद्धी माध्यमांना दिलंय. या निवेदनाद्वारे त्यांनी नयनतारा सहगल  यांना लेखी निमंत्रण दिलं होतं. सहगल यांच्या भाषा लेखनाबद्दल अनेक लोकांनी आक्षेप घेतले आणि संमेलन उधळून टाकण्याची भाषा वर्तमानपत्रातून केली. त्यामुळे कोणताही अडथळा येऊ नये यासाठी निमंत्रण मागे घेण्यात आलंय.

आक्षेप घेणाऱ्यांच्या कृतीने साहित्य संमेलनात व्यवस्था विस्कळीत होऊ नये आणि हानी होऊ नये म्हणून सदर संपूर्ण माहिती महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांना रमाकांत कोलते यांनी नागपूरहून दिली.  आयोजन समितीने निमंत्रण मागे घेतल्याचं पत्र नयनतारा यांना पाठवलं असल्याचं रमाकांत कोलते यांनी सांगितलं.

आयोजकांच्या भूमिकेवर नयनतारा यांची प्रतिक्रिया

नयनतारा यांनी आयोजकांच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केलंय. आयोजकांनी आग्रह केल्यामुळेच आपण या कार्यक्रमासाठी होकार दिल्याचं त्या म्हणाल्या. शिवाय भाषण अगोदरच आयोजकांना पाठवलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही याच कार्यक्रमात आहेत, हे माहित नव्हतं. भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझ्या भाषणाची भीती वाटली असावी, असा टोला नयनतारा यांनी लगावलाय.

मनसेचा संमेलन उधळून लावण्याचा इशारा

नयनतारा यांना दिलेल्या निमंत्रणावरुन मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला होता. मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी इंग्रजी लेखिकेला निमंत्रण कशाला असा सवाल मनसेने उपस्थित केला होता. अखेर आयोजकांनी आता निमंत्रणच रद्द केल्यामुळे वाद निवळण्याची शक्यता आहे.

कोण आहेत नयनतारा सहगल?

देशात दोन वर्षांपूर्वी पुरस्कार वापसीची मालिकाच सुरु झाली होती. सर्वात अगोदर पुरस्कार वापसी करणाऱ्या लेखिका म्हणून नयनतारा यांची ओळख आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या त्या भाची आहेत. नेहरु-गांधी कुटुंबातील सदस्य म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. पुरस्कार वापसीची कोणतीही तरतूद नसल्याने नयनतारा यांच्यासह 10 साहित्यिकांनी पुरस्कार पुन्हा स्वीकारले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *