AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran US Israel War : इराणचा जगाला अत्यंत मोठा इशारा, जगभरात उडणार हाहाकार, अनेक देशांमध्ये मोठी खळबळ

इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. याचदरम्यान आता इराणने मोठी घोषणा केली असून, ज्यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे.

Iran US Israel War : इराणचा जगाला अत्यंत मोठा इशारा, जगभरात उडणार हाहाकार, अनेक देशांमध्ये मोठी खळबळ
Motozba KhameneiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 11, 2026 | 9:48 PM
Share

मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र तरी देखील इराण माघार घेण्यास तयार नाहीये. दुसरीकडे इराणने आपल्या मिसाईल हल्ल्यांनं अमेरिका आणि इस्त्रालयच्या मनात चांगलीच धडकी भरवली आहे. इराणकडून मिसाईल हल्ले सुरूच असून, यामुळे अमेरिकेचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ज्या प्रकारची वक्तव्य करण्यात येत आहेत, त्यावरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, अमेरिकेला हे युद्ध आता लवकरात लवकर संपवायचं आहे. इराणने अमेरिकेच्या नाकेनऊ आणले आहेत. इराणचे मिसाईल हल्ले थांबवण्यासाठी आता अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे दक्षिण कोरियातील थाड एअर सिस्टम हळुहळु हलवण्यास अमेरिकेनं सुरुवात केली आहे. ही थाड यंत्रणा आता मध्य पूर्वेत तैनात करण्यात येणार आहे. यावरून हे स्पष्ट दिसत आहे, की अमेरिकेनं या युद्धाबाबत जो विचार केला होता, तसं घडताना दिसून येत नाहीये. दरम्यान हे युद्ध सुरू असतानाच आता जगाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

इराणने होर्मुजची सामुद्रधुनी बंद करून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील दबाव वाढवला आहे. मात्र यामुळे जगभरात मोठी इंधनटंचाई निर्माण झाली आहे. अनेक देशांमध्ये पेट्रोल,डिझेलचे दर हे गगनाला भिडले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र आता जगातील अनेक देशांवर एक भीषण संकट येण्याची शक्यता आहे. इराणकडून जगाला नवा इशारा देण्यात आला आहे. इराणच्या या इशाऱ्यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. इराणच्या सैन्य कमांडकडून जगाला मोठा इशारा देण्यात आला असून, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 200 डॉलरवर पोहोचतील असं इराणने म्हटलं आहे. इराणच्या या नव्या इशाऱ्यामुळे अनेक देशांची झोप उडाली आहे. जर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 200 डॉलरवर पोहोचले तर जगभरात पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.

रॉयटर्स वृत्त संस्थेच्या एका रिपोर्टनुसार इराणच्या खातम अल-अंबिया सैन्य मुख्यालयाचे प्रवक्ता इब्राहिम जोलफाकरी यांनी यासंदर्भात बोलताना हा इशारा दिला आहे. जागाला आता कच्च्या तेलासाठी प्रति बॅरल 200 डॉलर मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. इराणच्या या इशाऱ्यामुळे जगाची झोप उडाली आहे. जर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

Follow Us
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन