एकतर्फी प्रेमातून तरुणीची गार्डनमध्ये भोसकून हत्या, आरोपीने स्वतःलाही भोसकलं

| Updated on: Jan 06, 2020 | 3:06 PM

जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे एकतर्फी प्रेमातून 12 वीच्या वर्गात शिकणाऱ्या 17 वर्षीय तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली (Murder of girl by one sided lover).

एकतर्फी प्रेमातून तरुणीची गार्डनमध्ये भोसकून हत्या, आरोपीने स्वतःलाही भोसकलं
Follow us on

अमरावती : जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे एकतर्फी प्रेमातून 12 वीच्या वर्गात शिकणाऱ्या 17 वर्षीय तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली (Murder of girl by one sided lover). आरोपी तरुणाने गार्डनमध्येच तरुणीच्या पोटात चोकू भोसकून तिचा खून केला. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या पोटातही चोकू भोसकून घेतला. या हल्लात पीडित तरुणीचा जागीच मृत्यू झाला (Murder of girl by one sided lover).

आरोपी तरुणाने स्वतःच्या पोटातही चाकू भोसकून घेतल्याने तोही गंभीर जखमी झाला. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून याची पाहणी केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

एकतर्फी प्रेमातून झालेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. विशेषतः ज्या पालकांच्या मुली शाळा-महाविद्यालयात जात आहेत, त्यांच्याकडून आपल्या पाल्यांविषयी काळजी व्यक्त केली जात आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या खूनानंतर पोलिसांचा धाक नसल्याचंही बोललं जात आहे. तसेच मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष काळजी घ्यावी आणि सुरक्षा अधिक चोख करावी, अशी मागणी पालक करत आहेत.