नागपुरात वाळू माफियांची गुंडगिरी, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गाडी चढवण्याचा प्रयत्न

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

नागपूर : अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर वाळू माफियाकडून गाडी चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये अधिकारी थोडक्यात बचावले गेले. नागपूरमधील खरबी भागातील रिंगरोड परिसरात ही घटना घडली. नागपूरात खरबी भागात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती नायब तहसीलदार सुनील साळवे यांना मिळाली. त्यानुसार, नायब तहसीलदार सुनील साळवे आणि त्यांचं पथक मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास या वाळू माफियांवर […]

नागपुरात वाळू माफियांची गुंडगिरी, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गाडी चढवण्याचा प्रयत्न
Follow us on

नागपूर : अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर वाळू माफियाकडून गाडी चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये अधिकारी थोडक्यात बचावले गेले. नागपूरमधील खरबी भागातील रिंगरोड परिसरात ही घटना घडली.

नागपूरात खरबी भागात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती नायब तहसीलदार सुनील साळवे यांना मिळाली. त्यानुसार, नायब तहसीलदार सुनील साळवे आणि त्यांचं पथक मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास या वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी पोहोचलं. कारवाई सुरु असताना एक कार भरधाव वेगाने अधिकाऱ्यांच्या दिशेने आली आणि त्यांना कट मारुन पुढे निघाली. ही गाडी अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या ट्रक मालकाची होती. पुढे जाऊन या ट्रक मालकाने अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत ट्रक चालकांना ट्रक काढण्यास सांगितलं. अधिकाऱ्यांनी या ट्रक मालकाचा पाठलाग केला. मात्र, तो अधिकाऱ्यांच्या हाती लागला नाही.

या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नंदनवन पोलिसांनी या संदर्भात तपासाला सुरुवात केली आहे.

अवैध वाळू माफियांची ही गुंडगिरी काही नवीन नाही. यापूर्वीही नागपूरच्या नंदनवन भागात अशा घटना घडल्या आहेत. उमरेड आणि मौदा भागातून या ठिकाणी रेती येत असते. येथून हे वाळू माफिया रेतीची सर्रासपणे चोरी करतात. यावरुन वाळू माफियांना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याचं दिसून येत आहे.