ऑनलाईन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भलतेच कॉल, पैसे न दिल्यास ‘ते’ व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

| Updated on: Nov 28, 2020 | 4:21 PM

माझ्या अकाउंटमध्ये पैसे टाक नाहीतर तुझे सेक्स व्हिडीओ (Sex video) सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी धमकी देणारे फोन सध्या नाशिकच्या विद्यार्थ्यांना येत आहेत.

ऑनलाईन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भलतेच कॉल, पैसे न दिल्यास ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
Follow us on

नाशिक : तुमची मुलंही जर ऑनलाईन अभ्यास (Online Study) करत असतील तर सावधान राहा. कारण, ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याना (students) आता एका वेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. माझ्या अकाउंटमध्ये पैसे टाक नाहीतर तुझे सेक्स व्हिडीओ (Sex video) सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी धमकी देणारे फोन सध्या नाशिकच्या विद्यार्थ्यांना येत आहेत. या फोन कॉल्समुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे. नाशिकमध्ये अशाच एका त्रस्त पालकांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. (Nashik Students receiving threatening phone calls for money)

‘आमच्या अकाउंटवर तात्काळ पैसे टाक नाहीतर तुझा खासगी व्हीडियो सोशल मीडियावर व्हायरल करतो असे धमकीचे फोन सध्या नाशिकच्या काही विद्यार्थ्याना वारंवार येत आहेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणे हे कॉल्स आता विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील येत असून त्यांनाही धमकी देण्यात येत आहे. ‘तुमच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल करतो’ अशा धमक्या पालकांना दिल्या जात आहेत.

अशीच घटना सामाजिक क्षेत्रात निडरपणे काम करणाऱ्या राजू देसले यांच्या मुलासोबत घडली. राजू यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाणं गाठलं. या प्रकरणासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Nashik Students receiving threatening phone calls for money)

दरम्यान या, फोन कॉल्समुळे ऑनलाईन अभ्यास करणारे विद्यार्थी कमालीचे विचलित झाले असून अनेकांनी या फोन कॉलच्या भीतीपोटी अभ्यास करणंच बंद केलं आहे. राज्यभरात सध्या विद्यार्थ्याचं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. अशातच फोनवर लोकांची फसवणूक करणाऱ्या या टोळीने आता आपला मोर्चा थेट विद्यार्थ्यांकडे वळवल्याने पालक आणि विद्यार्थी वर्गात भीतीचं वातावरण आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

इतर बातम्या –

तुम्हीही करताय ऑनलाइन व्यवसाय तर सावधान, क्षणात होऊ शकतात अकाऊंटमधले पैसे गायब

ऑनलाइन शिक्षण घेता येत नसल्यामुळे शिक्षण रथातून धडे; शहादा येथील दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम

(Nashik Students receiving threatening phone calls for money)